सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय अन् बाबा रामदेव यांचे 2300 कोटींचे नुकसान!

Baba Ramdev | सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांची कंपनी असलेल्या पतंजलीला मोठा झटका दिला आहे. त्यानंतर बुधवारी सकाळी पतंजली फूड्सच्या शेअर्समध्ये सुमारे 4 टक्क्यांची घसरण झाली. खरं तर न्यायालयाने मंगळवारी रामदेव बाबांच्या पतंजली आयुर्वेद आणि त्यांचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांना औषधांच्या जाहिरातींमध्ये खोटे दावे केल्याप्रकरणी फटकारले आहे. तसेच लोकांची दिशाभूल होईल अशा जाहीरात न करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा परिणाम शेअर बाजारात सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्सवर दिसून येत आहे. कारण अवघ्या 105 मिनिटांत रामदेव बाबा यांच्या कंपनीचे सुमारे 2300 कोटी रुपयांचे नुकसान झाले. न्यायालयाच्या निर्णयानंतर बुधवारी कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.

2300 कोटींचे नुकसान!

आकडेवारीनुसार, BSE मध्ये पतंजली फूड्सचे शेअर्स सुमारे 4 टक्क्यांनी घसरले आहेत. त्यानंतर कंपनीचे शेअर 1556 रुपयांवर आले. तर एक दिवस आधी कंपनीचे शेअर्स 1620.20 रुपयांवर बंद झाले होते. सुप्रीम कोर्टाने पतंजलीला हृदयविकार आणि दमा यांसारखे आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्या उत्पादनांची जाहिरात करण्यासही मनाई केली आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) न्यायालयात पुरावे सादर केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला, ज्यामध्ये ‘द हिंदू’ वृत्तपत्रातील पतंजलीची जाहिरात आणि एका पत्रकार परिषदेत कंपनीने योगाच्या मदतीने मधुमेह आणि दमा पूर्णपणे बरा करण्याचा दावा केला होता. न्यायालयाला पतंजलीने मागील न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे आढळले.

Baba Ramdev यांना मोठा झटका

त्यामुळे आता पतंजलीला दिशाभूल करणाऱ्या जाहिराती देण्यापासून आणि दिशाभूल करणारे दावे करण्यापासून रोखण्यात आले आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर बुधवारी कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. कंपनीच्या शेअर्समधील घसरणीमुळे कंपनीच्या मूल्यांकनात लक्षणीय घट झाली.

105 मिनिटांच्या ट्रेडिंग सत्रात रामदेव बाबांच्या कंपनीचे सुमारे 2300 कोटी रुपयांचे नुकसान झाले. एका दिवसापूर्वी कंपनीचे मूल्यांकन 58,650.40 कोटी रुपये होते. सकाळी 11 वाजता ते 56,355.35 कोटी रुपयांवर पोहोचले. एकूणच 105 मिनिटांत कंपनीच्या मूल्यांकनात 2,295.05 कोटी रुपयांची घसरण झाली. सध्या कंपनीचे मूल्य 56,471.20 रुपये आहे.

News Title- Baba Ramdev’s Patanjali Company has suffered a loss of 2300 crores after the Supreme Court verdict
महत्त्वाच्या बातम्या –

झारखंड! रेल्वेचा भीषण अपघात; 12 जणांचा मृत्यू, भागलपूर-यशवंतपूर एक्स्प्रेसची धडक

तापसी पन्नू लग्न करणार असल्याची चर्चा; अभिनेत्रीचं सूचक विधान, म्हणाली…

BCCI ची कारवाई! इशान आणि श्रेयसचा ‘पगार’ बंद; जय शाहंनी दिला होता इशारा

BCCI चा वार्षिक करार! किशन-अय्यरला वगळलं; विराट-रोहितसह दोघांना मिळणार 7 कोटी

“आता लोकांनीही जरांगेंना डोक्यावरून उतरवलं, त्यांना माफी नाहीच”