BCCI ची कारवाई! इशान आणि श्रेयसचा ‘पगार’ बंद; जय शाहांनी दिला होता इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ishan Kishan Shreyas Iyer | भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने खेळाडूंचा वार्षिक करार जाहीर केला आहे. इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना करारातून मुक्त करून बीसीसीआयने कडक संदेश दिला आहे. राष्ट्रीय संघासोबत नसलेल्या खेळाडूंना कोणत्याही परिस्थितीत देशांतर्गत क्रिकेटला महत्त्व द्यावे लागेल, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. त्यामुळे देशांतर्गत क्रिकेटकडे दुर्लक्ष करणाऱ्या कोणत्याही खेळाडूला भविष्यात इशान किशन आणि श्रेयस अय्यरसारख्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते.

इशान किशन मागील काही कालावधीपासून भारतीय संघाबाहेर आहे. त्याने कौटुंबिक कारणास्तव रजा घेतली होती. तर, श्रेयस अय्यरला खराब फॉर्ममुळे वगळण्यात आले. पण दोन्हीही खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास नकार दिला. किशन आणि अय्यर यांनी बीसीसीआय सचिव जय शाह यांचा इशारा गांभीर्याने घेतला नाही आणि याचे परिणाम त्यांना भोगावे लागले आहेत.

BCCI ची कारवाई!

इशान किशनचा हा संपूर्ण वाद दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून सुरू झाला. इशान किशनने मानसिक आरोग्याचे कारण देत टीम इंडियातून आपले नाव मागे घेतले. यानंतर इशान किशनला इंग्लंड मालिकेसाठी संघात स्थान मिळाले नाही. किशनला संघात का घेतले जात नाही, असा प्रश्न उपस्थित झाला.

किशनला वगळल्यानंतर माध्यमांशी बोलताना टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी स्पष्ट केले की, टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी किशनला देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागेल. पण असे असूनही किशन रणजी ट्रॉफीपासून दूर राहिला आणि झारखंडकडून एकही सामना खेळला नाही.

Ishan Kishan Shreyas Iyer यांना डच्चू

श्रेयस अय्यरही इंग्लंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान वादात सापडला होता. अय्यरला कसोटी संघात स्थान मिळाले. मात्र दोन कसोटीत खराब कामगिरी केल्यानंतर अय्यरला टीम इंडियातून वगळण्यात आले. यानंतर अय्यरने रणजी ट्रॉफीकडे देखील दुर्लक्ष केले. एवढेच नाही तर अय्यरने रणजी ट्रॉफी न खेळण्यासाठी दुखापतीचे कारण पुढे केले. मात्र राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने अय्यर रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे स्पष्ट केले.

वरिष्ठ खेळाडूंनी रणजी ट्रॉफी न खेळणे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांना खटकल्याचे दिसते. नुकतेच बीसीसीआयकडून एक पत्र जारी करण्यात आले होते की जे खेळाडू राष्ट्रीय कर्तव्यावर नाहीत ते देशांतर्गत क्रिकेटकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत. पण अय्यर आणि किशन यांनी हे गांभीर्याने घेतले नाही. बीसीसीआयने आता कारवाई करत आयपीएलला महत्त्व देऊन कोणताही खेळाडू देशांतर्गत क्रिकेटकडे दुर्लक्ष करू शकत नाही, असे संकेत दिले आहेत.

News Title- BCCI drops Ishan Kishan and Shreyas Iyer from central contract for neglecting domestic cricket
महत्त्वाच्या बातम्या –

BCCI चा वार्षिक करार! किशन-अय्यरला वगळलं; विराट-रोहितसह दोघांना मिळणार 7 कोटी

“आता लोकांनीही जरांगेंना डोक्यावरून उतरवलं, त्यांना माफी नाहीच”

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, 1 मार्चपासून होणार मोठा बदल

‘इतक्या’ लाख कुटुंबांना घर देणार, सरकारची मोठी घोषणा

शिरूर मतदारसंघातून कोल्हेंविरोधात ‘हा’ नेता लढणार?