‘इतक्या’ लाख कुटुंबांना घर देणार, सरकारची मोठी घोषणा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | मोदी आवास योजनेची यवतमाळमध्ये सुरुवात होतेय. ओबीसी, भटके विमुक्त 1O लाख कुटुंबांना मोदी आवास योजनेतंर्गत स्वत:चं घर देणार आहोत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे.

“10 लाख कुटुंबांना घर देणार”

नारी शक्ती वंदनेचा कार्यक्रम असल्यामुळे घरातल्या पुरुषासोबतच महिलेची नाव देखील मालकी हक्कामध्ये देण्याच प्रयत्न असेल. मोदी आवास आहे, महिलांना त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करणार आहोत” असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

यवतमाळमध्ये नारी शक्ती वंदनेचा कार्यक्रम होतोय. पंतप्रधान उपस्थित आहेत. त्यांच्या हातून साडेपाच लाख बचतगटाना निधी देऊन महिला सक्षमीकरणाची सुरुवात या ठिकाणहून आपण करतोय. ही आनंदाची बाब आहे, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणालेत.

नरेंद्र मोदी काय म्हणाले?

10 वर्षांपूर्वी चाय पर चर्चा करायला आलो तेव्हा तुम्ही NDA ला 300 पार केले.. 2019 मध्ये आलो तेव्हा तुम्ही खूप प्रेम दिले, तेव्हा तुम्ही NDA ला 350 पार पोहोचवले. आणि आता 2024 मध्ये जेव्हा विकास पर्वाला आलो आहे. तेव्हा देशात एकच आवाज आहे, अब की बार 400 पार, असं मोदी म्हणालेत.

आम्ही शिवाजी महाराजांना मानणारे लोकं आहोत. शिवाजी महाराजांनी नेहमी देशाची चेतना जागी करण्यासाठी काम केले. आम्हीही त्यासाठी काम करत आहोत. देशाच्या प्रत्येक कोपऱ्याला विकसित बनवण्याचं माझा स्वप्न आहे. त्यासाठी चार प्राधान्य घटक आहे, असं नरेंद्र मोदी म्हणालेत.

आज मी एक बटण दाबले आणि लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात 21 हजार कोटी एवढी मोठी रक्कम पोहोचली आहे. हीच तर मोदींची गॅरंटी आहे. हेच काँग्रेस शासन असते, तर 21 हजार कोटी पैकी 18 हजार कोटी खाऊन टाकले असते, असं मोदी म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

शिरूर मतदारसंघातून कोल्हेंविरोधात ‘हा’ नेता लढणार?

रणवीर सिंहचा साधेपणा; आलिबागमधील खेडे गावातील तरूणांसोबत घालवला वेळ

टीम इंडियासाठी वाईट बातमी; ‘हा’ खेळाडू हॉस्पिटलमध्ये दाखल

नेहा कक्करच्या संसारात वादळ?, घटस्फोटाबाबत स्पष्टच म्हणाली…

निलेश राणेंना पुणे महानगरपालिकेचा दणका; पुण्यातील मॉल केलं सील