रणवीर सिंहचा साधेपणा; आलिबागमधील खेडे गावातील तरूणांसोबत घालवला वेळ

Ranveer Singh | बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंह (Ranveer Singh) हा अनेकदा वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतो. त्याच्या स्टायलिश कपड्यांची अनेकदा चर्चा असते. त्याच्या अभिनयाची देखील अनेकदा चर्चा पाहायला मिळते. याचसोबत एक चांगला अभिनेता असून तो एक उत्तम माणूस देखील आहे. तो एक एनर्जेटिक व्यक्तिमत्त्व आहे. रणवीर सिंह हा मोठा अभिनेता असला तरीही त्याचे पाय जमीनीवर आहेत. अशातच आता रणवीर सिंह (Ranveer Singh) आता पुन्हा एकदा एका कारणासाठी चर्चेत आला आहे.

रणवीर सिंह (Ranveer Singh) हा नेहमी सामान्य माणसांमध्ये वावरताना दिसतो. त्याच्यामध्ये कोणताही एक आविर्भाव पाहायला मिळत नाही. तो सध्या अलिबागमध्ये एका सातीर्जे गावामध्ये गेला असताना तो खेडेगावातील तरूणांसोबत क्रिकेट खेळताना दिसला आहे. त्याने क्रिकेट खेळण्याचा मनमुरादपणे आनंद लुटला आहे, अशी माहिती समोर आली असून आलिबागचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांच्या घरी जात भेट दिली आहे. (Ranveer Singh)

ठाकूर कुटुंबीयांकडून रणवीरचं स्वागत

रणवीर सिंह अनेक कारणांसाठी चर्चेत असतो. त्याच्या अभिनयाप्रमाणे त्याचा फॅशन सेन्सही नेहमीच चर्चेत असतो. अशातच तो आता अलिबागमध्ये गेला असताना त्याचं स्वागत करण्यात आलं असून त्याने खेडेगावातील लोकांसोबत गप्पा मारल्या आणि तरूणांसोबत क्रिकेटचा आनंद घेतला आहे. पाटील कुटुंबीयातील महिलांनी त्याचं औक्षण केलं आहे.

वाढदिवसातही दर्शवली उपस्थिती

रायगड जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर, नाना ठाकूर, मानसी ठाकूर मिनाक्षी ठाकूर, कमळ ठाकूर आणि सदस्य यावेळी उपस्थित होते.

राजाभाऊ ठाकूर यांचे थोरले बंधू  अॅड. प्रवीण ठाकूर यांची कन्या धनश्री ठाकूरच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यासाठी त्याने आपली उपस्थिती दर्शवली आहे.

अभिनयासोबतच तो चांगलं क्रिकेट खेळत असल्याचं त्याने गावकरी तरूणांसोबत दाखवलं आहे. त्याला मोह आवरता आला नाही म्हणून त्याने गावातील तरूणांसोबत क्रिकेटचा आनंद लुटला आहे. तो नेहमी अलिबागला येत असतो दरम्यान आता मापगाव येथे 90 गुंठे जागा दीपिका आणि रणवीरने 22 कोटी रूपयांना विकत घेतली आहे.

News Title – Ranveer Singh Played Cricket At Alibaug

महत्त्वाच्या बातम्या

गौतमी पाटील ‘या’ पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार?

अत्यंत धक्कादायक! शालेय पोषण आहारात चक्क मेलेल्या उंदराचे अवशेष

मोदींच्या सभेतील खुर्च्यांवर राहुल गांधींचे स्टिकर्स लावत काँग्रेसचा प्रचार!

संकष्टी चतुर्थीचा दिवस ‘या’ राशींसाठी ठरेल अत्यंत शुभ!

शरद पवारांचं देवेंद्र फडणवीसांना ओपन चॅलेंज; थेट म्हणाले..