मोदींच्या सभेतील खुर्च्यांवर राहुल गांधींचे स्टिकर्स लावत काँग्रेसचा प्रचार!

Narendra Modi

Narendra Modi | आगामी लोकसभा निवडणूक आता काही महिन्यांवर आली आहे. यवतमाळ येथील भारी या परिसरामध्ये मोदींची सभा होणार आहे. या सभेच्या ठिकाणी दोन लाखांहून अधिक महिला उपस्थित राहणार आहेत. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची आतापर्यंत अनेकदा सभा झाली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा यवतमाळ येथे सभा होणार आहे. ही सभा सर्वात मोठी सभा असणार असून सभा मंडप देखील मोठा असणार आहे. यासभेसाठी नागपूर येथे वापरलेल्या राहुल गांधी यांच्या खुर्च्या आहेत.

मोदी (Narendra Modi) यांच्या यवतमाळ येथील सभेमध्ये वापरलेल्या खुर्च्यांवर राहुल गांधी यांचा फोटो असून स्कॅन टू डोनेट असे या स्टिकर्सवर लिहिलं आहे. दरम्यान विदर्भातील 10 लोकसभा मतदारसंघ डोळ्यासमोर ठेऊन या सभेचं आयोजन केलं आहे. 9 लाख 10 हजार स्क्वेअर फुटाचा सभामंडप लावण्यात आला आहे. त्यावर काही खुर्च्यांवर राहुल गांधी यांचे स्टिकर्स लावण्यात आले आहेत.

नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासभेमध्ये राहुल गांधी यांच्या खुर्च्या असल्याने सभेला वेगळाच रंग प्राप्त होऊ शकतो अशी माहिती समोर आली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार अशी मंत्रीमंडळातील अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. याआधी देखील नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा यवतमाळ दौरा झाला होता.

नागपूरच्या सभेतील खुर्च्या

नागपुर येथे राहुल गांधी यांच्यासभेमध्ये राहुल गांधी यांच्या खुर्च्या होत्या, आता त्याच खुर्च्या यवतमाळ येथील नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी वापरण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या खुर्च्या यवतमाळमध्ये आणताना राहुल गांधी यांचे स्टिकर्स काढले नाहीत. यवतमाळमधून नरेंद्र मोदी 10 लोकसभेचे रणशिंग फुंकणार आहे.

खुर्च्यांच्या माध्यमातून राहुल गांधी यांचा प्रचार

खुर्च्यांच्या माध्यमातून राहुल गांधी यांचा प्रचार होत आहे. मोदी यांची दुपारी 4 दरम्यान सभा होणार आहे. त्याआधी दे स्टिकर्स काढले जाणार का? असा प्रश्न आहे. तसेच या सभेतून ते विविध कार्यक्रमांचे लोकार्पण ऑनलाईन माध्यमातून करणार आहे.

यवतमाळ जिलह्यातील जण संघाचे अध्यक्ष पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या स्मारकाचे लोकार्पण सायंकाळ 4.30 होणार आहे. हे स्मारक यवतमाळ शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर दोन एकर परिसरामध्ये उभारण्यात आला आहे. 41 फूट उंचीचा हा पुतळा असून पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा जीवन प्रवास फोटोच्या माध्यमातून उलगडण्यात आला आहे.

News Title – Narendra Modi Election Meeting In Rahul Gandhi’s Stickers

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .