विराट कोहलीनंतर त्याचा मित्रही झाला ‘बाबा’, चिमुकल्या परीचं आगमन

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Kane Williamson | न्यूझीलंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज केन विल्यमसन तिसऱ्यांदा बाबा झाला आहे. त्याची पत्नी सारा रहीमने एका मुलीला जन्म दिला आहे. विल्यमसनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर पत्नी आणि नवजात मुलीसोबतचा एक फोटो शेअर करून ही आनंदाची बातमी दिली आहे. केनने फोटोसोबत लिहिले की, या जगात सुंदर मुलीचे स्वागत आहे. अलीकडेच भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज विराट कोहली दुसऱ्यांदा बाबा झाला.

विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माने एका मुलाला जन्म दिला. किंग कोहलीच्या लेकाचे नाव अकाय असे ठेवण्यात आले आहे. आता विराटचा जवळचा सहकारी केन विल्यमसन तिसऱ्यांदा बाबा झाला आहे. केन आणि सारा या जोडप्याला आधी दोन मुले आहेत. मोठी मुलगी तीन वर्षांची आहे, तिचे नाव मॅगी आहे, तर लहान मुलगा एक वर्षाचा आहे.

चिमुकल्या परीचं आगमन

केन विल्यमसन रजेवर असल्यामुळे न्यूझीलंडच्या नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत खेळला नाही. तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत तो जबरदस्त फॉर्ममध्ये होता, ज्यामुळे ब्लॅक कॅप्सला दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पहिली कसोटी मालिका जिंकण्यात मदत झाली.

केन विल्यमसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चार डावांत प्रत्येकी तीन शतके झळकावली. त्याने माउंट मौनगानुई येथे 118 आणि 109 धावांची खेळी खेळली आणि हॅमिल्टनमधील दुसऱ्या कसोटीत त्याने 43 आणि नाबाद 133 धावा केल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kane Williamson (@kane_s_w)

 

Kane Williamson तिसऱ्यांदा झाला बाबा

दरम्यान, 32 कसोटी शतकांसह विराट कोहलीसारख्या दिग्गज खेळाडूला मागे टाकून सर्वाधिक कसोटी शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विल्यमसन 12व्या स्थानावर पोहोचला. केन विल्यमसन आणि विराट कोहली यांच्यातील मैत्री सर्वश्रुत आहे. दोघेही अंडर-19 क्रिकेटच्या दिवसांपासूनचे मित्र आहेत.

मैदानाबाहेरील विराट आणि केन यांचे बॉन्डिंग क्रिकेट विश्वाला भुरळ घालते. आता वैयक्तिक आयुष्यातही या स्टार क्रिकेटर्सच्या घरी जवळपास एकाच वेळी आनंदाची बातमी आली आहे. याच महिन्यात विराट कोहली आणि अनुष्का शर्माही त्यांच्या दुसऱ्या मुलाचे आई-वडील झाले आहेत. मोठी मुलगी वामिकाच्या जन्मानंतर हे जोडपे आता एका मुलाचे पालक झाले आहे, ज्याचे नाव त्यांनी अकाय असे ठेवले आहे.

News Title- After Virat Kohli, New Zealand player Kane Williamson has become a father
महत्त्वाच्या बातम्या –

आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री अडकणार विवाहबंधनात; प्रियकरासोबत घेणार सातफेरे

गाडी अडवली म्हणून अभिनेत्रीने होमगार्डचे कपडे फाडले, फोन हिसकावला; गुन्हा दाखल

“मनोज जरांगे कोणाला माहित नव्हता, आज तो शरद पवारांचा बाप झालाय”

जरांगे विरूद्ध फडणवीस वाद आणखी वाढणार?; जरांगेंचा पुन्हा गंभीर इशारा

“जरांगेंना शरद पवार आणि रोहित पवार यांच्याकडून मदत”