Taapsee Pannu | बॉलिवूडमधील अनेक कलाकार विवाहबंधनात अडकत आहेत. रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानीनंतर आता बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूही लग्नाच्या तयारीत असल्याची बातमी आहे. (Taapsee Pannu Wedding) तापसीच्या लग्नाशी संबंधित काही माहिती समोर आली आहे, ज्यामध्ये अभिनेत्री कुठे लग्न करण्याचा विचार करत आहे हे सांगितले जात आहे. लवकरच ‘डिंकी’ चित्रपटातील अभिनेत्री तापसी तिचा प्रियकर आणि बॅडमिंटनपटू मॅथियास बो याच्यासोबत यावर्षी मार्चमध्ये लग्नबंधनात अडकणार असल्याचे वृत्त आहे.
माहितीनुसार, तापसी तिच्या प्रियकरासोबत सुमारे 10 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे आणि आता त्यांनी 2024 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. असे बोलले जात आहे की तापसीने तिच्या लग्नासाठी राजस्थानची निवड केली आहे जिथे शाही पद्धतीने लग्न होणार असल्याची चर्चा आहे.
प्रियकरासोबत घेणार सातफेरे
यापूर्वी प्रियांका चोप्रा, परिणीती चोप्रा, कतरिना कैफ आणि कियारा अडवाणी या अभिनेत्रींनीही त्यांच्या लग्नासाठी राजस्थानची निवड केली होती. मात्र, तापसीकडून लग्नाबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही. खरं तर तापसीने तिच्या प्रियकरासोबतचे नाते लपवलेले नाही आणि ती वेळोवेळी त्याच्यासोबत सोशल मीडियावर पोस्ट देखील करते.
तापसी पन्नू ही केवळ हिंदीच नाही तर तेलुगू आणि तमिळ चित्रपटसृष्टीतील देखील प्रसिद्ध चेहरा आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. 2010 मध्ये तापसीने ‘झुम्मंडी नादम’ या तेलगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. बॉलिवूडबद्दल बोलायचे झाले तर, तिने 2013 मध्ये ‘चश्मे बद्दूर’ मधून पदार्पण केले होते.
Taapsee Pannu करणार लग्न
तापसीच्या प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपटांबद्दल भाष्य करायचे झाले तर, ‘जुडवा 2’, ‘बदला’, ‘नाम शबाना’, ‘पिंक’ आणि ‘शाबाश मिठू’ असे अनेक चित्रपट आहेत. तापसी तिच्या अप्रतिम अभियनयाने चाहत्यांना भुरळ घालत असते. आता ती लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे.
तापसी पन्नू मागील 10 वर्षांपासून मॅथियास बो याला डेट करत आहे. मात्र, अद्याप या जोडप्याकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. यावर अभिनेत्री जे काही बोलली ते तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते. तापसीने अलीकडेच मॅथियासबद्दल मोकळेपणाने बोलताना सांगितले की, ती तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट चश्मे बद्दूरच्या शूटिंगच्या वेळी त्याला भेटली होती.
News Title- Bollywood actress Taapsee Pannu and Mathias Bo are going to get married
महत्त्वाच्या बातम्या –
गाडी अडवली म्हणून अभिनेत्रीने होमगार्डचे कपडे फाडले, फोन हिसकावला; गुन्हा दाखल
“मनोज जरांगे कोणाला माहित नव्हता, आज तो शरद पवारांचा बाप झालाय”
जरांगे विरूद्ध फडणवीस वाद आणखी वाढणार?; जरांगेंचा पुन्हा गंभीर इशारा
“जरांगेंना शरद पवार आणि रोहित पवार यांच्याकडून मदत”
वसंत मोरे शरद पवार गटात जाणार?; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण