“जरांगेंना शरद पवार आणि रोहित पवार यांच्याकडून मदत”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange Patil | गेले अनेक महिन्यापासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा आरक्षणासाठी आंदोलन उपोषण करताना दिसत आहे. अनेकदा ते आंदोलन करत राजकीय नेत्यांवर आरोप करताना दिसत आहेत. यामुळे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांचा हात असल्याचा धक्कादायक दावा मराठा आंदोलनकर्त्यांनी केला आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं आंदोलन हे स्क्रिप्टेड असल्याचं वक्तव्य मराठा आंदोनलकर्त्यांनी केलं आहे.

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी देवेंद्र फडणवीस यांचा मला मारण्याचा प्लॅन केला असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला होता. त्यानंतर आता मराठा आंदोलक अजय महाराज बारस्कर आणि संगीता वानखेडे यांनी धक्कादायक दावे केले आहेत. मनोज जरांगे पाटील यांची एसआयटी चौकशी करण्याबाबत मागणी संगीता वानखेडे यांनी केली आहे.

“मनोज जरांगे याचं आंदोलन हे स्क्रिप्टेड”

मनोज जरांगे पाटील यांच्यावर एसआयटी करा अशी मागणी असल्याचं संगीता वानखेडे म्हणाल्या आहेत. जरांगे पाटील यांची चौकशी झाल्यानंतर सर्व दुध का दुध पाणी का पाणी होईल. शरद पवार आणि रोहित पवार यांच्याकडून जरांगे पाटील यांना मदत मिळत आहे. सगळ्यांना ताब्यात घेत चौकशी करा म्हणत मनोज जरांगे याचं आंदोलन हे स्क्रिप्टेड आहे, असं संगीता वानखेडे म्हणाल्या.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे. जाणूनबुजून फसवणूक केली आहे. येत्या निवडणुकीला मनोज जरांगे यांना गावोगावी फिरत पैसे गोळा करत आहेत. निवडणुकीमध्ये त्याला त्याची माणसं निवडूण आणायची आहेत.

आमच्या समाजाचं वाटोळं केलं आहे. गाड्या कुठून आल्या चौकशी करा. आमच्या समाजाचं वाटोळं केलं असून आमच्या समाजातील मुलांवर गुन्हे दाखल केले आहेत, असं संगीता वानखेडे म्हणाल्या आहेत.

शरद पवार यांचा हात

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पामध्ये विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे शरद पवार यांचा हात असल्याचं दावा केला आहे.

News Title – Manoj Jarange Patil Protesting is Scripted

महत्त्वाच्या बातम्या