Pune News | पुण्यातील चाकणमध्ये घडलेल्या एका हत्याकांडाने संपूर्ण पुणे शहराला हादरवून सोडलं आहे. चाकणमध्ये अल्पवयीन मुलांनी मिळून अल्पवयीन मित्राचीच हत्या केल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. चाकणमधील एका रिकाम्या प्लॉटमध्ये ही घटना सोमवारच्या रात्री घडली आहे.
अल्पवयीन मुलांचं धक्कादायक कृत्य
शाब्दिक चकमकीतून सुरू झालेला वादाचे पडसाद थेट हत्येत उमटले आहेत. मृत अल्पवयीन मुलावर चार महिन्यांपूर्वीच हत्येचा गुन्हा दाखल आहे. तर हत्या करणाऱ्यांपैकी एकावर मारहाणीचा गुन्हा दाखल आहे.
चाकण पोलिसांनी मुख्य आरोपीसह अल्पवयीन मित्राला ताब्यात घेतलेलं आहे. मृत मुलगा, मुख्य आरोपी अन तिसरा साथीदार तिघे मद्यपान करत होते. त्यावेळी मृत मुलात आणि तिसऱ्या मित्रात शाब्दिक चकमक झाली. यातून मृत मुलाने त्याच्या कानशिलात लगावली. हे पाहून मुख्य आरोपी संतापला आणि त्याने मृतकाला दगडाने ठेचल्याची माहिती समोर आलीये.
हत्येचा व्हिडीओ स्टेट्सवर
या घटनेच्या व्हिडीओ इन्स्टाग्रामवर स्टेट्स ठेवण्याची हिंमत आरोपींनी दाखवली. या प्रकरणी चाकण पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या हत्याप्रकरणातील आरोपी 17 वर्षीय आहेत.
या हत्येचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अल्पवयीन मुलांमधील ही क्रूरता पाहून पिंपरी चिंचवड पोलिसांना धक्का बसला आहे.
दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारी वाढली आहे. पुणे पोलिसांकडून ही गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु त्यानंतरही कोयते हल्ले, रस्त्यांवर हल्ले, चोरी, दरोडो आणि मारहाण असे प्रकार घडत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
विधानसभेत राडा; आशिष शेलारांनी जरांगेंना सुनावलं, म्हणाले ‘एवढी हिंमत आली कुठून’
‘जरांगेंचा बोलविता धनी कोण?’, देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
‘टिळक-गोखल्यांचं पुणे नशेच्या विळख्यात, याला जबाबदार कोण?’; ठाकरे भडकले
मनोज जरांगेंच्या अडचणीत वाढ; सरकारने थेट घेतला ‘हा’ मोठा निर्णय
धक्कादायक! प्रसिद्ध इन्स्टाग्राम इन्फ्ल्युएन्सरची पतीने केली हत्या