दिवंगत सिद्धू मुसेवालाची आई देणार बाळाला जन्म!

Sidhu Moose Wala Mother

Sidhu Moose Wala Mother | दिवंगत लोकप्रिय पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याच्या घरातून एक खुशखबरी आली आहे. सिद्धू मुसेवाला याची गुंडांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला होता. आता त्याच्या घरी खूप दिवसांनी एक आनंदाची बातमी (Sidhu Moose Wala Mother) समोर आली आहे.

गायक सिद्धू मुसेवालाची आई गर्भवती असून, लवकरच बाळाला जन्म देणार असल्याची माहिती मिळत आहे. त्याची आई चरण कौर पुन्हा एकदा आई होणार असल्याचं म्हटलं जातंय. या बातमीमुळे सर्वचजण जरा आश्चर्य व्यक्त करत आहेत.

सिद्धू मुसेवालाची आई गरोदर

या वयात चरण कौर पुन्हा एकदा आई (Sidhu Moose Wala Mother) होणार असल्याच्या वृत्ताने याचीच चर्चा रंगत आहे. सिद्धू मुसेवालाची हत्या झाली तेव्हा, तो केवळ 28 वर्षांचा होता. आता त्याची आई पुढील महिन्यात बाळाला जन्म देणार असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

सिद्धू मुसेवाला हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. मात्र, 29 मे 2022 रोजी बिष्णोई गँगने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याचा जीव घेतला. सिद्धूच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा त्याच्या घरी एक लहान बाळ येणार आहे. एका रिपोर्टनुसार सिद्धू मुसेवाला याचे काका चमकौर सिंह यांनी याबाबत माहिती दिली आहे.

सिद्धू मुसेवाला आजही चाहत्यांच्या मनात

आयव्हीएफच्या मदतीने चरण कौर (Sidhu Moose Wala Mother) यांची गर्भधारणा केल्याचं बोललं जात आहे. सिद्धू मुसेवाला याच्या काकांनी या वृत्ताला दुजोरा दिला असला, तरी त्याच्या पालकांनी यावर अधिकृत अशी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे सध्या फक्त आणि फक्त याचीच चर्चा रंगत आहे.

पंजाबमधील अल्पावधीतच लोकप्रिय आणि श्रीमंत झालेल्या गायकांमध्ये सिद्धू मुसेवालाचं देखील नाव घेतलं जातं. हत्या झाल्यानंतर त्याची काही गाणी रिलीज झाली होती. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्याने राजकारणातही नशीब आजमावले होतं. 2022 मध्ये पंजाब विधानसभेची निवडणूक त्याने काँग्रेसच्या तिकीटावर मानसा येथून लढवली, मात्र यात त्याचा पराभव झाला होता.

News Title : Sidhu Moose Wala Mother Pregnant

महत्त्वाच्या बातम्या –

विधानसभेत राडा; आशिष शेलारांनी जरांगेंना सुनावलं, म्हणाले ‘एवढी हिंमत आली कुठून’

‘जरांगेंचा बोलविता धनी कोण?’, देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

‘टिळक-गोखल्यांचं पुणे नशेच्या विळख्यात, याला जबाबदार कोण?’; ठाकरे भडकले

मनोज जरांगेंच्या अडचणीत वाढ; सरकारने थेट घेतला ‘हा’ मोठा निर्णय

धक्कादायक! प्रसिद्ध इन्स्टाग्राम इन्फ्ल्युएन्सरची पतीने केली हत्या

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .