विधानसभेत राडा; आशिष शेलारांनी जरांगेंना सुनावलं, म्हणाले ‘एवढी हिंमत आली कुठून’

Manoj Jarange Patil | गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मराठा आरक्षणासाठी आंदोलन, उपोषण करत आहेत. मात्र आता त्याचं खरं रूप बाहेर आल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला आहे. आधी मराठा आरक्षणाच्या मागणीवर त्यांनी उपोषण केलं. त्यानंतर त्यांनी भुजबळ यांच्यावर टीका केल्या त्यानंतर अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि नंतर एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत. यामुळे आता मुंबई भाजप आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत बोलत असताना मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर हल्लाबोल केला.

मराठा आंदोलनाचे पडसाद विधानसभेत

मराठा आंदोलनाचे पडसाद हे आता थेट विधानसभेमध्ये उमटायला लागले आहेत. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे गेल्या काही दिवसांपासून नेत्यांबाबत वक्तव्य करत आहेत. यामुळे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यामागे कोणी आहे का? असा सवाल आता आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. निपटून टाकू, संपवून टाकू, अशी बोलायची हिंमत आली कुठून असा सवाल आता आशिष शेलार यांनी केला आहे.

“एसआयटी चौकशी करा”

आशिष शेलार यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मनोज जरांगे पाटील यांना बोलण्याची हिंमत आली कशी? मनोज जरांगे पाटील यांच्या मागे कोणी तरी आहे का?, असे अनेक प्रश्न त्यांना पडले आहेत. आपण मनोज जरांगे यांच्या एक एक मागण्या मान्य केल्या आहेत. मात्र आता मनोज जरांगे पाटील यांच्या भाषेत बदल होत आहे. महाराष्ट्र बेचिराख करण्याचं ते बोलत आहेत. यामुळे त्यांची एसआयटी चौकशी करा, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांचं एकही वात्रट भाषण नाही. त्यांनी कायदा आणि संविधानानुसार भाषण केलं आहे. त्यांचा एकेरी भाषेत वक्तव्य मनोज जरांगे पाटील करत आहेत. आम्ही मराठा समाजाच्या मागे आहोत पण निपटून टाकू अशी भाषा आली कुठून?, असा सावल आता आशिष सेलार यांनी केला आहे.

महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण उधळून टाकू असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं होतं. तुम्ही कोण आहात प्रधानमंत्र्यांना महाराष्ट्रामध्ये भाषण करून देत नाहीत. त्यांच्या मागे कोण आहे?, असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.

ज्या कारखान्यात दगडफेक झाली तो कारखाना कोणाचा आहे. घटनास्थळी दगडफेक करण्यासाठी दगडी कोठून आणण्यात आली होती. सर्व प्रकार एका घरातून सुरू आहे. एका आंदोलनात जेसीपी आणले गेले. ते कोणत्या पक्षाचे आहे कोणत्या नेत्याचे आहे. त्यांची भूमिका महत्वाची आहे, याची एसआयटी तपास करा, असं आशिष शेलार म्हणाले.

News Title – Manoj jarange patil Against Ashish Shelar news Update

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगेंच्या अडचणीत वाढ; सरकारने थेट घेतला ‘हा’ मोठा निर्णय

धक्कादायक! प्रसिद्ध इन्स्टाग्राम इन्फ्ल्युएन्सरची पतीने केली हत्या

‘…तो फडणवीसांचा डाव होता’; आमदाराच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

मोठी गुड न्यूज! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

नाकात पाईप, हातात बँडेज; मोहम्मद शमीचे रूग्णालयातील फोटो आले समोर!