मनोज जरांगेंच्या अडचणीत वाढ; सरकारने थेट घेतला ‘हा’ मोठा निर्णय

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange Patil | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जरांगे पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यांच्यामागे नेमकं कोण आहे, याबाबत प्रश्न केला जात असतानाच आता सत्ताधाऱ्यांनी जरांगेंविरोधात आक्रमक (Manoj Jarange Patil) भूमिका घेतली आहे.

आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजपा नेते आशिष शेलार यांनी हा विषय मांडला. यावरून सभागृहमध्ये बराच वाद झाला. “महाराष्ट्रात काहीतरी भयंकर घडण्यासाठी कट रचला जातोय, अशी परिस्थिती आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. महाराष्ट्र बेचिराख करण्याच्या भूमिकेविरोधात या सदनात नाही बोलणार तर कुठे बोलणार?, असा सवाल यावेळी शेलार यांनी उपस्थित केला आहे.

संपवून टाकू, निपटून टाकू याचे बळ कोणी दिले? ही भाषा नेमकी कुणाची? मुख्यमंत्री, भुजबळ यांना धमकी देण्याची हिंमत कोणी दिली?, अंतरवली सराटीत दगडफेक कुणी केली? त्यामागे कुणाचा हात आहे हे समोर आलं पाहिजे, अशी मागणी शेलार यांनी केली आहे.

जरांगेंच्या आंदोलनाची SIT चौकशी होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा उधळून लावू अशी भाषा करणारे तुम्ही कोण? कटकारस्थानाची ही योजना बनली कशी? मराठा समाजाची मोनोपॉली एका व्यक्तीला दिलीये काय? जरांगे कुठं राहतात? तो कारखाना कुणाचा? ते दगड कुठून आले? हे समोर यावं. अंतरवली सराटी दगडफेकप्रकरणाची एसआयटी चौकशी करा. यामागे राष्ट्रवादी काँग्रेस असेल तर या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हायलाच हवी, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.

भाजप नेते आशिष शेलार यांच्या या मागणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही त्याला पाठिंबा दिला आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची आता एसआयटी चौकशी केली जाईल, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

उपमुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द वापरला, ऐकेरी उल्लेख केला जातोय. मानसन्मानाच्या बाबतीत फडणवीसांनी कधी ब्र काढला नाही. कायदा सुव्यवस्था, राज्य सरकार आणि भारताविरोधात फडणवीस कधी बोलत नाही. पण तरीही उपमुख्यमंत्र्यांना निपटून टाकण्याची भाषा केली जाते. एका मंत्र्यापासून उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत हे पोहोचलं. हे चाललंय काय?, असा संतप्त सवाल देखील शेलार यांनी केला आहे.

उपमुख्यमंत्र्यांविरोधत कटकारस्थान केलं जातंय काय?

यावेळी शेलार यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बोलण्याच्या आदल्या दिवशी यांच्या पक्षाचे प्रवक्ते पोपटलाल बोलले. सकाळी 9 वाजता भाजपला एका दिवसात संपवू असं एकजण म्हणाले. आणि दुसऱ्या दिवशी मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्र्यांविरोधात भूमिका घेतली. म्हणजे हे सगळं काही कटकारस्थान आहे काय?, असा सवाल शेलार यांनी केला.

यानंतर विरोधकही चांगलेच आक्रमक झाले. सभागृहात गोंधळ वाढू लागल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कामकाज तहकूब देखील केलं. यानंतर जरांगे यांच्या आंदोलनाची (Manoj Jarange Patil) एसआयटी चौकशीची घोषणा करण्यात आली. या निर्णयामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

News Title : Manoj Jarange Patil agitation to be probed by SIT 

महत्त्वाच्या बातम्या –

मोठी गुड न्यूज! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

नाकात पाईप, हातात बँडेज; मोहम्मद शमीचे रूग्णालयातील फोटो आले समोर!

अत्यंत महत्त्वाची बातमी; ‘या’ भागांमध्ये 100 टक्के पाणीकपात

‘मराठी भाषा गौरव दिन’! राज ठाकरेंची लांबलचक पोस्ट; तरूणांना केलं खास आवाहन

व्हॉट्सॲप प्रोफाईल फोटोचा गुपचूप स्क्रिनशॉट घेणाऱ्यांच्या अडचणी वाढणार!