धक्कादायक! प्रसिद्ध इन्स्टाग्राम इन्फ्ल्युएन्सरची पतीने केली हत्या

Instagram Influencer Anamika Bishnoi

Anamika Bishnoi | राजस्थानच्या फलोदी येथून एक धक्कादायक प्रकरण समोर येत आहे. प्रसिद्ध इन्स्टाग्राम इन्फ्ल्युएन्सर असेलल्या एका महिलेची (Anamika Bishnoi) तिच्याच पतीने गोळ्या झाडून हत्या केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

घटनेचा व्हिडीओ बघून हळहळ व्यक्त केली जात आहे. भर दिवसा दुकानात घुसून थेट गोळ्या झाडल्याने महिलेचा अतिरक्तस्त्राव होऊन तिचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे सध्या या प्रकरणाचीच चर्चा होत आहे.

इन्स्टाग्राम इन्फ्ल्युएन्सरची गोळ्या झाडून हत्या

या प्रसिद्ध इन्स्टाग्राम इन्फ्ल्युएन्सर महिलेचं नाव अनामिका बिश्नोई असे आहे. ती पतीपासून विभक्त राहत असल्याची माहिती मिळत आहे. अनामिकाचे इन्स्टाग्रामवर बरेच फॉलोअर्स होते. ती राजस्थानी गाण्यांवर अनेक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर टाकत असत. राजस्थानी वेशातले तिचे बरेच व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

अनामिका (Anamika Bishnoi) आणि तिचा पती महिराम यांच्यात काहीतरी वाद असल्याने ते बऱ्याच वर्षांपासून विभक्त राहतात. राजस्थानच्या फलोडी येथे अनामिका वूमन कलेक्शन सेंटर चालवित होती. मात्र रविवारी (25 फेब्रुवारी) अचानक अनामिकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली.

व्हिडीओ व्हायरल

अनामिका ही आपल्या दुकानात बसलेली या व्हिडीओत दिसून येत आहे. त्यातच महिराम दुपारी दुकानात येतो, तेव्हा त्यांच्यात वादावादी होत असल्याचे दिसत आहे. काऊंटरसमोर उभ्या असलेल्या महिरामशी अनामिकाची शाब्दिक चकमक सुरू असते. अचानक महिराम पिस्तूल काढून अतिशय जवळून अनामिकावर गोळी झाडतो आणि तिथून निघून जातो.

गळ्यावर गोळी लागल्याने अनामिकाचा (Anamika Bishnoi) जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. ‘राजस्थान तक’ या संकेतस्थळाने दिलेल्या बातमीनुसार, अनामिका आणि महिराम यांचा 13 वर्षांपुर्वी विवाह झाला होता. मात्र, काही वर्षांनी त्यांनी विभक होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यात नेहमीच वाद होत असल्याचे म्हटले जात आहे.

News Title- Instagram Influencer Anamika Bishnoi Husband Shoots Her Dead

महत्त्वाच्या बातम्या –

बाबरचा झंझावात! ठरला जगातील दुसरा खेळाडू; फ्रँचायझीकडून महागडी गाडी भेट

“..तर बॉलीवुड इंडस्ट्रीच संपेल”, प्रसिद्ध अभिनेत्रीचं खळबळजनक वक्तव्य

‘ड्रामा क्वीन’ करणार राजकारणात एंट्री?, थेट म्हणाली..

मोठी बातमी: मनोज जरांगे पाटील यांच्यावर पोलीस कारवाई होणार?, गृहराज्यमंत्र्यांचे मोठे संकेत

‘या’ गोष्टीत दडलाय सुखी वैवाहिक आयुष्याचा राज!

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .