मोठी बातमी: मनोज जरांगे पाटील यांच्यावर पोलीस कारवाई होणार?, गृहराज्यमंत्र्यांचे मोठे संकेत

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadanvis) यांच्यावर धक्कादायक आरोप केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे, तसेच काही भागांमध्ये इंटरनेटा सेवा खंडीत करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी मोठे संकेत दिले आहेत.

नेमकं काय म्हणाले शंभूराज देसाई?

“सुरुवातीला जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी मराठवाड्यातील नऊ जिल्ह्यातील पूर्वजांच्या कुणबी नोंदी प्रमाणे प्रमाणपत्राची मागणी केली, सरकारने ती मागणी पूर्ण केली. परत त्यांनी हे सर्व महाराष्ट्राभर लागू करा ही नवी मागणी केली, सरकारने तीही मागणी पूर्ण केली.”

“मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी जस्टीस शिंदे समिती नेमली. समितीने अहवाल दिला. तब्बल लाख कर्मचारी नेमून मागासवर्गीय आयोगाकडून सर्वेक्षण पूर्ण करुन मराठी समाज आर्थिक मागास असल्याचा डाटा जमवला आणि कोर्टात टिकणारे आरक्षण दिले”, असं गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई म्हणाले.ॉ

मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना वापरलेल्या शब्दांवरुन महाभारत होताना दिसत आहे. यावरही गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी भाष्य केलं आहे. त्यांच्या यासंदर्भातील वक्तव्यामुळे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर पोलीस कारवाई होणार का?, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

जरांगेंनी सगळी वक्तव्यं तपासणार!

मनोज जरांगे यांचे बिनबुडाचे आरोप खपवून घेणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मांडली होती. भाजपमधील अनेक नेत्यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांना इशारा दिला होता. त्यापार्श्वभूमीवर शंभूराज देसाई यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे.

मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) सतत आपली भूमिका बदलली. काल त्यांनी कहर करीत फडणवीसांना अरे-तुरेची भाषा वापरली. त्यामुळे मराठा समाज नाराज झाला आहे. काल ते म्हटले की “मी सागर बंगल्याकडे चाललो, नंतर पुन्हा माघारी परतले. सरकारने आता कठोर निर्णय घेतला. त्यांची सगळी वक्तव्ये तपासली जातील”, अशी घोषणा शंभूराज देसाई यांनी केली आहे.

दरम्यान, कायदा आणि पोलिस आपले काम करतील, असा इशारा देखील त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे. “जे द्यायचे होते ते दिले आहे आणि काही मागण्या असतील त्यावरही विचार केला जाईल”, असंही पुढं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.

News Title: Shambhuraj desai on Manoj Jarange Patil

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ गोष्टीत दडलाय सुखी वैवाहिक आयुष्याचा राज!

“सर्रास गोळीबार, खून, ड्रग्ज..”, प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा घटस्फोट! व्हिडीओ शेअर करत म्हणाली, मला आनंद होत आहे!

शेतकऱ्यांनो सावधान! राज्याच्या ‘या’ भागात हवामान खात्याचा पावसाचा इशारा

ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनच्या मुलीबद्दलने नव्याने केला सर्वात मोठा खुलासा!