शेतकऱ्यांनो सावधान! राज्याच्या ‘या’ भागात हवामान खात्याचा पावसाचा इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maharashtra Weather Update | हवामानात सतत होणाऱ्या बदलामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढतच आहेत. बदलत्या हवामानामुळे आरोग्याच्याही अनेक समस्या उद्भवत आहेत. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. आता उन्हाचे चटके जाणवू लागताच पुन्हा हवामान विभागाने पावसाचा (Maharashtra Weather Update) इशारा दिला आहे.

रब्बी हंगाम काढण्याची वेळ असताना अवकाळी पावसाचे संकट आले आहे. त्यामुळे राज्यात आता तीन दिवस यलो अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात गारपीट आणि पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

विदर्भामध्ये आज पाऊस पडणार

हवामान विभागाकडून आज (26 फेब्रुवारी) नागपूरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नागपूरसह परिसरात आज वादळी वारे, पाऊस आणि गरपीटीचा अंदाज दिला आहे. तसेच पारा सरीसरीपेक्षा 2 ते 4 अंशांनी घसरण्याची शक्यता आहे.

राज्यात पुन्हा एकदा थंडीही वाढली आहे. काही ठिकाणी पहाटे आणि रात्री गार वारे वाहत आहेत. यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच सर्दी-खोकला या आरोग्याच्या समस्यादेखील उद्भवत आहेत. आता तीन दिवस पाऊस (Maharashtra Weather Update)  पडणार, म्हटल्यावर शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

राज्यातील ‘या’ भागांना यलो अलर्ट

राज्यात आज (26 फेब्रुवारी) नांदेड, हिंगोली, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यास यलो अलर्ट दिला आहे. तर, नागपूरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उद्या म्हणजेच 27 फेब्रुवारी रोजी वर्धा, अमरावती, नागपूर, गोंदिया, भंडारा जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट (Maharashtra Weather Update) दिला आहे.

तसेच, वाशिम, अकोला, यवतामाळ, बुलढाणा, परभणी, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यासही यलो अलर्ट देण्यात आला आहे. 28 फेब्रुवारी रोजी अमरावती, नागपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यात यलो अलर्ट दिला आहे.

News Title –  Maharashtra Weather Update

महत्त्वाच्या बातम्या –

मनोज जरांगे पाटील माघारी फिरले, मराठा बांधवांना केलं महत्त्वाचं आवाहन

“सागर बंगल्याबाहेरील मोठी भिंत पार करा…”; नितेश राणेंचं जरांगेंना आव्हान

सदावर्तेंनी शरद पवारांचं नाव घेत केली ‘ही’ मोठी मागणी

‘खुमखुमी असेल तर फडणवीस यांनी…’; जरांगे भडकले

आदित्य ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंना चॅलेंज, म्हणाले…