ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनच्या मुलीबद्दलने नव्याने केला सर्वात मोठा खुलासा!

Aishwarya Rai | अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबदल दिवसेंदिवस चर्चा सुरु आहेत. प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री अलीकडच्या काळात तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. शिवाय ऐश्वर्याच्या वागणूकीबाबत बच्चन कुटुंबांतील काही व्यक्तींनी तक्रार देखील केली होती. मात्र, आता ऐश्वर्याची (Aishwarya Rai) मुलगी आराध्याबद्दल नव्याने मोठा खुलासा केला आहे.

काय म्हणाली नव्या?

ऐश्वर्या (Aishwarya Rai) सारखीच तिची मुलगी आराध्या कायम चर्चेत असते. स्टारकिड्समधून जास्त चर्चेत असणारी म्हणजे आराध्या. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्यासोबत आराध्या देखील सध्या पापाराझींपुढे झळकत असते. दरम्यान, आराध्याबदल नव्या म्हणजेच अभिषेक बच्चनची भाची हिने एक मोठा खुलासा केला आहे. एका मुलाखतीमध्ये बोलत असताना नव्याला प्रश्न विचारण्यात आला. जर तूला आराध्याला सल्ला द्यायचा असेल तर तू काय सल्ला देशील?

आराध्या खूप हुशार आहे-

नव्या म्हणाली, “मला आराध्याला विशेष असा काही सल्ला द्यायचा नाहीये. कारण तिच्या वयोमानानुसार ती खूपच हुशार आहे. ती आता 12 वर्षांची आहे आणि त्या वयोमानानुसार ती खूप हुशार आहे. तिला बऱ्याच गोष्टींचं योग्य ज्ञान आहे. त्यामुळे ही गोष्टच इतकी भारी आहे की या पिढीला जगातील किती ज्ञान आहे. समाज आणि आपल्या आजूबाजूच्या गोष्टींविषयी ती खूप जागरूक झाली आहे. तिला मी वेगळा काय सल्ला द्यावा हे मला कळत नाही.”

 

आराध्या खूप लहान आहे-

दरम्यान, बोलत असताना ती नव्या म्हणाली की, “आराध्या लहान आहे मी तिची प्रशंसा करत आहे. बऱ्याच गोष्टींबद्दल ती जागरुक असते आणि तिला बऱ्याच गोष्टींची योग्य माहितीसुद्धा आहे. घरातील बऱ्याच गोष्टी शेअर करण्यासाठी मला एक छोटी बहीण आहे, याचा मला खूप आनंद आहे. पण मला असं वाटत नाही की मी तिला काही सल्ला देऊ शकेन. तिचा आत्मविश्वास भारावून टाकणारा आहे.”

News Title : aishwarya rai and abhishek’s daughter navya reavels truth

महत्त्वाच्या बातम्या-

“आम्हीही मराठा आहोत, वेळ आल्यावर दाखवून देऊ”, मनोज जरांगेंविरोधात नितेश राणे आक्रमक

मराठा आंदोलनामुळे तणाव, ‘या’ जिल्ह्यांमध्ये इंटरनेट आणि एसटी सेवा बंद

मनोज जरांगे पाटील माघारी फिरले, मराठा बांधवांना केलं महत्त्वाचं आवाहन

“सागर बंगल्याबाहेरील मोठी भिंत पार करा…”; नितेश राणेंचं जरांगेंना आव्हान

सदावर्तेंनी शरद पवारांचं नाव घेत केली ‘ही’ मोठी मागणी