“सागर बंगल्याबाहेरील मोठी भिंत पार करा…”; नितेश राणेंचं जरांगेंना आव्हान

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange Patil | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे सरकारकडे ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करत आहे. मात्र सरकार ओबीसी आरक्षणाला धक्का न लागू देता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेत आहे. पण मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे सगेसोयरे अंमलबजावणी होत नाही. त्यांनी जर ठरवलं तर होईल, असा दावा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केला आहे.

त्यानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. तुम्हाला बळी घ्यायचा असेल तर माझा बळी घ्या. मी सागर बंगल्यावर येतो. तुमच्या पायाशी मी आंदोलन करतो. देवेंद्र फडणवीस यांना मला मारायचं आहे. त्यांचा सलाईनमध्ये विष घालून मारण्याचा प्लान आहे. त्यामुळे मी सलाईन घेणं बंद केलं आहे. फडणवीस यांचा बामणी कावा माझ्या समोर टिकणार नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

हिंदु महासंघ फडणवीस यांच्या बाजूने आक्रमक

पुण्यातील हिंदु महासभा आक्रमक झाली आहे. हिंदु महासभेचे आनंद दवे यांनी जरांगे विकृत आहेत. शेवटी त्यांना देवेंद्रजी यांची जात आठवलीच ना? असा मिश्कील सवाल केला आहे. मराठा समाज ब्राह्मण उपमुख्यमंत्री असलेल्यांकडे आरक्षणाची मागणी करत होता आणि आजही करत आहे. आज तुम्ही बदलले हे लवकरच बंद करा, असा खोचक टोला दवे यांनी लगावला आहे.

संभाजी ब्रिगेड जरांगे यांच्या बाजूने

देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी खळबळजनक दावा केला होता. फडणवीस यांनी बामणी कावा दाखवू नये, असं वक्तव्य केलं होतं. यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांच्या बाजूने संभाजी ब्रिगेडने आवाज उठवला आहे. मराठा समाजाला आरक्षण न देण्याचं सरकारचं षडयंत्र आहे. ते हानून पाडण्याचं काम सरकार करत आहे. हे मनोज जरांगे पाटील यांच्यामाध्यमातून उघडकीस आलं आहे, असा दावा संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ता संतोष शिंदे यांनी केला आहे.

“आमची भिंत पार करा आणि नंतरच…”

मनोज जरांगे पाटील हे सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडे रवाना झाले आहेत. यावर आता भाजपचे नेते नितेश राणे यांनी वक्तव्य केलं आहे. “मराठा आंदोलन नेमकं कशासाठी आहे? मराठा समाजासाठी आहे की देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्यासाठी आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची बदनामी केली जात आहे. फडणवीस यांना टार्गेट केलं जात आहे. सागर बंगल्याकडे चालले आहात. तिथं एक आमची भिंत आहे. ती भिंत पार करा आणि नंतरच सागर बंगल्यावर पोहोचा”, असं नितेश राणे म्हणाले आहेत.

दरम्यान भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांच्या मागे शरद पवार आहेत, असं वक्तव्य केलं आहे. म्हणून आता शरद पवार हे याप्रकरणी काय बोलणार हे पाहणं गरजेचं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबतीत कोणतंही अक्षर काढलेलं नाही.

News Title – Manoj Jarange Patil And Nitesh Rane News Update

महत्वाच्या बातम्या

‘खुमखुमी असेल तर फडणवीस यांनी…’; जरांगे भडकले

आदित्य ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंना चॅलेंज, म्हणाले…

मनोज जरांगे पाटील सागर बंगल्याकडे रवाना!

वाघामुळे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड मोठ्या अडचणीत!

“माझ्या सलाईनमध्ये विष टाकून मला मारण्याचा प्लॅन…”; जरांगेंच्या आरोपाने खळबळ