Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत मागणी करताना दिसत आहेत. यामुळे सरकार त्यांना 10 टक्के आरक्षण देण्यास तयार झालं आहे. मात्र ओबीसीतून आरक्षण हवं असल्याचा निश्चय मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांचा आहे. याचपार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी अंतरवाली सराटीमध्ये उपोषण केलं आहे. उपोषणाचा आज 16 वा दिवस असून ते आता सागर बंगल्याकडे रवाना होण्याच्या चर्चा आहेत.
मनोज जरांगे पाटील सागर बंगल्याकडे रवाना
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी करत आहेत. मात्र सरकार ओबीसी समाजाला धक्का न देता आरक्षण देण्याचा विचार करत आहे. यामुळे आज अंतरवाली सराटीतून ते मुंबईतील सागर बंगल्याकडे रावाना झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे काही आंदोलकही सागर बंगल्याकडे रवाना झाले आहेत. (Manoj Jarange Patil)
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
मनोज जरांगे पाटील यांनी बैठकीला काही नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे. त्यांनी थेट नाव घेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मला मारण्याचा प्लान असल्याचा धक्कादायक दावा केला आहे. त्यानंतर त्यांनी अजित पवार गटातील दोन आमदार आणि शिंदे गटातील दोन आमदारांनी मला मारण्यचा प्लान आहे. माझ्या सलाईनमध्ये विष टाकण्याचं प्लॅनआहे म्हणून मी सलाईन घेत नाही. वाटत असेल तर मी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर येतो. माझा एनकाऊंटर करा, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
त्यानंतर काही वेळाआधी मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे सागर बंगल्यावर रवाना झाले आहेत. आज त्यांचा उपोषणाचा 16 वा दिवस आहे. त्यांची प्रकृती सध्या खालावली असून त्यांनी एक घोट पाणीही पिलं नाही. अशातच ते आता सागर बंगल्यावर अंतरवालीतून जात आहेत. यावर त्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत.
“सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न”
देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी गंभीर आरोप केले आहेत. मला सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न आहे. म्हणून मी सलाईन घेणं बंद केलं आहे. राहुल महाराज बारस्कर यांच्या मागे नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस आसल्याचा धक्कादायक खळबळजनक आरोप केला आहे. सागर बंगल्यावर फडणवीस यांच्या पायाशी जाऊन मी आंदोलन करणार आहे.
छत्रपतींच्या खाली बसून सांगतो मी कुठल्याही पक्षाचा नाही, मी सामाजाचा आहे आणि समाजावर माझी निष्ठा आहे. मी केवळ समाजाच आहे. कोणीतरी मराठा समाजाला हरवण्याचं स्वप्न बघत आहे. यामुळे छगन भुजबळ यांना देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे अजित पवार यांच्यासोबत जावं लागलं, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
News Title – Manoj Jarange Patil Claim To devendra fadanvis About kill Him
महत्त्वाच्या बातम्या
वाघामुळे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड मोठ्या अडचणीत!
“माझ्या सलाईनमध्ये विष टाकून मला मारण्याचा प्लॅन…”; जरांगेंच्या आरोपाने खळबळ
मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर खळबळजनक आरोप!
मुंबईकरांसाठी चिंताजनक बातमी, तहान भागवणारी धरणे आटली
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी; हवामान विभागाचा इशारा