मुंबईकरांसाठी चिंताजनक बातमी, तहान भागवणारी धरणे आटली

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mumbai Pune Water | गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि मुंबईसारख्या (Mumbai Pune Water) शहरांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावं लागत आहे. महापालिका महिन्यातून एखाद वेळा तरीही पाणी पाणी कपात करताना दिसत आहेत. यंदाचा उन्हाळा येण्यापूर्वीच पिण्याच्या पाण्याची अवघड परिस्थिती पाहायला मिळत आहे. याचं आता कारणही समोर आलं आहे.

पुणे शहराला दिलासा

मुंबईकरांवर पाण्याचं संकट आलं आहे. मुंबईत 1 मार्चपासून 10 टक्के पाणी कपात होणार असल्याची शक्यता आहे. मुंबईची तहान भागवणाऱ्या 7 ही धरणात केवळ 45.43 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या तीन वर्षातील पावसाळ्यापर्यंत पुरणारा नाही. यामुळे पाणी कपात होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु पुणे शहराला दिलासा देणार निर्णय आहे. कालवा समितीच्या बेठकीमध्ये पाणी कपाच करण्याचा निर्णय झाला. (Mumbai Pune Water)

मुंबईत पाणी टंचाई होण्याची शक्यता

मुंबईतील परिस्थितीमुळे भातसा आणि उधर्व वैतरणा धरणातील राखीव साठ्यातील पाणी मिळावे यासाठी पालिकेने राज्य सरकारने प्रस्ताव पाठविला. मात्र 10 दिवसानंतर कोणतंही उत्तर न आल्याने पाणी कपातीचा प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी पाठविल्याची माहिती सूत्रांद्वारे समोर आली. उधर्व, वैतरणा, मोडक सागर, तानसा, भातसा, विहार, तुळशी या सात धरणामध्ये 45.43 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे पाणी कपातीचे निर्णय पालिकेने घेतले असून त्यानूसार पाणी पुरवठा होणार असल्याची शक्यता आहे. (Mumbai Pune Water)

पुणेकर पाणी जपून वापरा

पुणे शहराला खडकवासला धरण आहे. या धरणामध्ये 55 टक्के पाणी साठा आहे. मुंबईपेक्षा 10 टक्के पाणीसाठा अधिक आहे. यामुळे पुण्यातही थोडीफार तशीच परिस्थिती पाहायला मिळते. खडकवासला धरण आणि इतर पाणीसाठा मिळून सर्व पाणी साठवून ठेवण्यात आलं. (Mumbai Pune Water)

कालवा समितीच्या बेठकीला 15 जुलैपर्यंत पाणी पुरेल इतके पाणी राखून ठेवण्याचा निर्णय झाला आहे. यामुळे पुणे शहरासाठी आता 7.4 टीएमसी पाणी उपलब्ध झाले आहे. या निर्णयामुळे पुणेकरांवर असणारे पाणीकपातीचे संकट टळले आहे.

मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये कालवा सल्लागार समितीची बैठक झाली होती. त्या बैठकीत पाण्याची परिस्थिती पाहून फेब्रुवारीमध्ये निर्णय घेण्याचे ठरले. तोपर्यंत पाणी जपून वापरण्याच्या सूचना केल्या होत्या. पाणी बचत केल्यामुळे पुणेकरांवर पाणी टंचाईचे संकंट आले नाही. मुंबईहून पुणे शहराला अधिक पाणी पुरवठा होत आहे. मात्र यंदाच्या पावसाळ्यापर्यंत पिण्याचे पाणी साठवणे आणि पाणी जपून ठेवणे हे एक पुणेकरांसाठी आणि महापालिकेसाठी मोठं आव्हान आहे.

News Title – Mumbai Pune Water Issue News Update

महत्त्वाच्या बातम्या

“ममता बॅनर्जी आता ‘दीदी’ राहिल्या नाहीत, त्या आता ‘काकू’ झाल्या आहेत”

मोहम्मद शमीला खास पुरस्कार; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते सन्मान

अम्पायरला शिवी देणं खेळाडूला भोवलं; ICC ने सुनावली मोठी शिक्षा

बाबर आझमसमोर आक्षेर्पाह नारेबाजी; पाकिस्तानचा माजी कर्णधार भडकला, Video Viral

हॉटनेसचा तडका अन् मनोरंजन! करीना, तब्बू आणि क्रितीचा ‘क्रू’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला