राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी; हवामान विभागाचा इशारा

Rain Update | राज्यात सध्या ऊन आणि गारव्याचा खेळ पाहायला मिळत आहे. उत्तर भारतात अनेक ठिकाणी पाऊस तर जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी सुरु आहे. तर राज्यात देखील आज अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

भारतीय हवामान खात्याने आता विदर्भ आणि मराठवाड्याला अवकाळी पावसाचा इशारा देत “येलो अलर्ट” (Rain Update) जाहीर केला आहे. रविवारी राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता देखील वर्तवली आहे.

हवामान विभागाचा इशारा

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अवकाळी पावसाच्या आगमनाचा इशारा आहे. रविवारी राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता (Rain Update) देखील वर्तवली आहे.

काही जिल्ह्यात आजपासून अवकाळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे. मराठवाडा आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे विदर्भ, आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीपर्यंत वाऱ्याचे प्रवाह खंडित झाले आहेत. त्यामुळेच पूर्व मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे.

कोणत्या जिल्ह्यात पावसाचा शक्यता?

मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाने ( IMD ) दिलेल्या माहितीनुसार , रविवारी पूर्व मध्य प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका किंवा मध्यम पाऊस पडू शकतो. मध्य प्रदेशात जोरदार वाऱ्यासह तुरळक पावसाची शक्यता आहे. 26  फेब्रुवारीला छत्तीसगडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘या’ 3 स्कीममुळे व्हाल लखपती; महिन्याला गुंतवा फक्त 500 रुपये

उन्हाळ्यात पर्यटनासाठी ‘ही’ ठिकाणे ठरू शकतात बेस्ट ऑप्शन

“ममता बॅनर्जी आता ‘दीदी’ राहिल्या नाहीत, त्या आता ‘काकू’ झाल्या आहेत”

मोहम्मद शमीला खास पुरस्कार; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते सन्मान

अम्पायरला शिवी देणं खेळाडूला भोवलं; ICC ने सुनावली मोठी शिक्षा