उन्हाळ्यात पर्यटनासाठी ‘ही’ ठिकाणे ठरू शकतात बेस्ट ऑप्शन

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Spring Holiday Destinations | भारतातील बहुतेक राज्यांमध्ये आता थंडी हळूहळू संपत आहे आणि वसंत ऋतु जवळपास आला आहे. कडक उन्हाळा सुरू होण्यापुर्वी बरेच जण बाहेर फिरायला जायचा प्लॅन (Spring Holiday Destinations) करत असतात.मात्र, कोणत्या ठिकाणी जायला हवे, कसे जावे याबाबत निर्णय घेणे थोडे कठीण जाते.

आता तुम्हाला अशा काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जे तुमच्या बजेटमध्येही असतील आणि तुम्हाला तिथे खूप एंजॉय देखील करता येईल. भारतात उन्हाळा आणि हिवाळा यांच्यामधील ऋतुला वसंत ऋतु म्हणतात. वसंत ऋतू हा उत्तर भारत आणि लगतच्या राष्ट्रांतील सहा ऋतूंपैकी एक आहे, ज्याचे आगमन फेब्रुवारी-मार्च आणि एप्रिल दरम्यान होते.

पिकनिक, कॅम्पिंग, हायकिंग आणि प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी हा काळ अत्यंत चांगला असतो. या काळात हवामान सौम्य आणि आल्हाददायक असते. हिरवीगार हिरवळ आणि बहरलेली फुले यामुळे मन प्रसन्न होते. तुम्हाला या ऋतुचा मनसोक्त आनंद घ्यायचा असेल तर, तुम्हाला इथे काही ऑप्शन दिले आहेत.

‘ही’ 6 ठिकाणे आहेत बेस्ट ऑप्शन

काश्मीर : काश्मीरला भारतातील जमिनीवरचे स्वर्ग म्हटले जाते. या काळात (Spring Holiday Destinations) इथले वातावरण अत्यंत सुंदर असते.तुम्ही काश्मीर बरोबरच श्रीनगरमधील इंदिरा गांधी मेमोरियल ट्यूलिप गार्डन देखील बघू शकता. येथे पर्यटक शालिमार, निशात आणि चष्मा शाही उद्यानांना भेट देतात.

मुन्नार (केरळ) : चहाच्या बागा आणि हिरवाईसाठी प्रसिद्ध मुन्नार वसंत ऋतुमध्ये स्वर्गात बदलते. या हंगामात येथील तापमान 19°C ते 35°C दरम्यान असते. इथल्या टेकड्यांसोबत हिरवाईचा आनंद लुटता येतो. त्यामुळे या वसंत ऋतुमध्ये भेट देण्यासाठी हे ठिकाण सुंदर आहे.

शिलाँग (मेघालय) : पूर्वेचे स्कॉटलंड म्हणून ओळखले जाणारे शिलाँग वसंत ऋतूमध्ये खूप आकर्षक असते. येथे रोडोडेंड्रॉन आणि ऑर्किड फुले फुलली की, तो नजारा बघण्यासारखा असतो.

कूर्ग (कर्नाटक) : कूर्ग याला भारताचे स्कॉटलंड असेही म्हटले जाते. ते कॉफीच्या मळ्यासाठी आणि धुक्यासाठी प्रसिद्ध आहे. वसंत ऋतूमध्ये, कॉफीच्या फुलांच्या सुगंधाने येथील वातावरण अत्यंत सुंदर बनते.तुम्ही डोंगरांमध्ये धुक्याचा आनंद देखील घेऊ शकता.

गुलमर्ग (काश्मीर): एप्रिल ते जूनच्या (Spring Holiday Destinations) सुमारास गुलमर्गला भेट द्यावी. हा असा हंगाम आहे जेव्हा प्रवाशांना हिरवेगार गवताळ प्रदेश आणि बर्फाच्छादित पर्वत पाहायला मिळतात. वसंत ऋतूमध्ये बर्फ वितळण्यास सुरवात होते, ज्यामुळे रंगीबेरंगी फुलांचे गालिचे दिसते.

उटी (तामिळनाडू) : निलगिरी हिल्समध्ये वसलेले उटी हे एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे जे चांगल्या हवामानासाठी आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते. वसंत ऋतूमध्ये येथील बागा रंगांनी भरतात. ज्यामध्ये रोडोडेंड्रॉन, ऑर्किड आणि गुलाब यांसारखी फुलं फुललेली असतात.

News Title – Spring Holiday Destinations  

महत्त्वाच्या बातम्या-

सासऱ्यांविरोधात लढणार का?; रक्षा खडसेंनी स्पष्टच सांगितलं

शर्मिला ठाकरे अन् अमित ठाकरे उतरले पुण्याच्या रस्त्यावर, केली मोठी मागणी

उद्धव ठाकरेंना धक्का?; ईडीच्या कचाट्यात सापडलेला नेता शिंदे गटाच्या वाटेवर?

रोहित पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप; म्हणाले..

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!