पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune News | जसा-जसा उन्हाळा जाणवू लागलाय तशा पाण्याच्या समस्या वाढत आहेत. ऐन उन्हाळ्यात अनेक ठिकाणी पाणी कपात केली जात आहे. यामुळे नागरिकांना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. पुणे (Pune News) व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील सोसायट्या, अपार्टमेंट व गृहसंकुलांना भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या तक्रारीबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे.

आता पुण्यातील नागरिकांना पाणीटंचाईच्या तक्रारी थेट ई-मेलवर करता येणार आहेत. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका दर महिन्याला स्वतंत्र बैठक देखील घेणार आहे. त्यामुळे पुण्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पाणीटंचाईच्या निराकरणसाठी विशेष समिती स्थापन

पुण्यात आता विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अध्यक्षतेखाली दोन्ही महापालिका व नागरिकांच्या प्रतिनिधींची द्वैमासिक बैठक होणार आहे. या बैठकांची सर्व माहिती आणि पाणीटंचाईच्या तक्रारींच्या निराकरणाचा अहवाल पुढे मुंबई उच्च न्यायालयाला सादर केला जाणार आहे.

झालं असं की, पुण्यात (Pune News) पाणी टंचाईची समस्या गंभीर बनली आहे. नागरिकांना यामुळे अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय. यामुळेच विविध स्वयंसेवी संस्थांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यावर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार एक विशेष समिति स्थापन करण्यात आली होती.

याच समितीची बैठक बुधवारी घेण्यात आली. या बैठकीमध्ये पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ‘पीएमआरडीए’ परिसरातील पाणीटंचाईच्या समस्या सोडवण्यासाठी एक आराखडा तयार करण्यात आला आहे.

पुणेकरांना ‘यावर’ तक्रार करता येणार

पाणीटंचाईच्या समस्या असतील तर पुण्यातील (Pune News) नागरिक आता ई-मेल द्वारे तक्रार करू शकतात. पुणे महापालिका हद्दीतील रहिवाशी waterpil126@punecorporation.org या मेलवर तक्रार करू शकतात. तर, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील नागरिकांना water@pcmcindia.gov.in या ई-मेलवर तक्रार करता येईल.

News Title-  Pune News Water shortage complaints on e-mail

महत्त्वाच्या बातम्या –

‘आयुष्यात अंधार आलाय पण…’, घटस्फोटानंतर ईशा देओलची पोस्ट चर्चेत

“अशोक सराफ म्हणजे मराठी मातीतला अस्सल हिरा”

पाणी जपून वापरा! ‘या’ तारखेपासून पाणी कपात होणार

गुड न्यूज! सोने-चांदीचे भाव उतरले, जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

ईशा देओलनंतर ‘ही’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्री झाली पतीपासून विभक्त