Mumbai News | मुंबईकरांना आता काही दिवस पाणी जपून वापरावे लागणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (Mumbai News) काही भागांचं पाणी कपात करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे नगरिकांची मोठी अडचण वाढणार आहे. उन्हाळा अजून सुरूही झाला नाही, तोच पाणी टंचाईचा प्रश्न उभा ठाकला आहे.
त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. बीएमसीच्या जल विभागाची दुरुस्ती आणि पुनर्वसन केलं जात असल्याने काही भागांच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे.
‘या’ तारखेपासून पाणी कपात
बृहन्मुंबई महानगरपालिकेने 27 फेब्रुवारी ते सोमवार,11 मार्च या कालावधीत (Mumbai News) वांद्रे आणि खार पश्चिम (एच-पश्चिम वॉर्ड) मधील काही भागात पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार असल्याचं म्हटलं आहे. पाली हिल जलाशयातील जुन्या जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात येणार असल्याने पाणी कपात केली जाणार आहे.
त्यामुळे सोमवार 11 मार्चनंतर एच-पश्चिम वॉर्डातील या भागात संपूर्ण पाणीपुरवठा सुरू होईल. तत्पूर्वी या भागांचं 10 टक्के पाणी कपात केलं जाईल. BMC पाली हिल जलाशयात 600 मिमी व्यासाची कॅप सेट केली जात आहे. त्यामुळे एच-पश्चिम वॉर्डातील पाणीपुरवठ्यावर 16 ते 21 फेब्रुवारीपर्यंत परिणाम झाला.
पाणी जपून वापरण्याचं आवाहन
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांमध्ये पाणीसाठा कमी असल्याने पालिका आगामी दिवसांत पाणीकपात जाहीर करण्याची शक्यता आहे. या महिन्याच्या सुरुवातीमध्ये मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील पाणीसाठा सुमारे 49 टक्के होता.
गेल्या 3 वर्षांमधील हा सर्वात कमी पाणीसाठा असल्याची नोंदही झाली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात मुंबईकरांचे (Mumbai News) पाण्यासाठी चांगलेच हाल होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
News Title- Mumbai News water cut in Mumbai from February 27
महत्त्वाच्या बातम्या –
बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न मनोहर जोशींच्या रूपानं पूर्ण झालं – राज ठाकरे
शेतकरी आंदोलन! जिममध्ये व्यायाम करताना DSP यांना हृदयविकाराचा झटका, जागीच मृत्यू
पत्नी दारू पिऊन धिंगाणा घालते, सतत पैसे मागते; पीडित पतीची पोलिसांत धाव
मृणाल ठाकूरला दिग्गदर्शकाने चित्रपट नाकारला; अभिनेत्रीनं सांगितलं धक्कादायक कारण
प्रतीक्षा संपली! IPL च्या 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर; लवकरच CSK vs RCB थरार