प्रतीक्षा संपली! IPL च्या 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर; लवकरच CSK vs RCB थरार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 Schedule | इंडियन प्रीमिअर लीग 2024 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यंदाच्या आयपीएल हंगामाला 22 मार्चपासून सुरूवात होणार आहे. (IPL 2024 Full Schedule) सलामीचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात चेन्नईत होणार आहे. गुरुवारी 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, लोकसभा निवडणुकीमुळे उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार आहे. आयपीएल शुक्रवारपासून सुरू होणार आहे, तर डबल हेडर सामने शनिवार आणि रविवारी खेळवले जातील.

महेंद्रसिंग धोनीची चेन्नई सुपर किंग्ज आणि विराट कोहलीची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ पहिल्या सामन्यात आमनेसामने असतील. आयपीएल 2024 चा पहिला सामना आरसीबी आणि सीएसके यांच्यात सामना होणार आहे. आयपीएल 2024 ला 22 मार्चपासून सुरूवात होत आहे आणि यावेळी लोकसभा निवडणुकीमुळे केवळ निम्मे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर

सध्या 22 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीतील सामन्यांचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे, ज्या दरम्यान एकूण 4 डबल हेडर सामने खेळवले जातील. यावेळी दिल्ली कॅपिटल्स संघ विशाखापट्टणम येथे दोन सामने खेळणार आहे, जे त्यांचे घरचे मैदान असेल. संध्याकाळचे सामने 7.30 वाजता सुरू होतील, तर दुपारचे सामने 3.30 वाजता सुरू होतील.

देशात 2024 मध्ये एप्रिल-मे मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आणि मतदान केव्हा आणि कोणत्या भागात होणार हे स्पष्ट झाल्यानंतर उर्वरित वेळापत्रक त्यानुसार जाहीर केले जाईल.

 

IPL 2024 Schedule । RCB vs CSK पहिला सामना

आयपीएल 2024 मध्ये एकूण 74 सामने खेळवले जातील, सध्या फक्त 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयपीएलमध्ये एकूण 10 संघ आहेत, गेल्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जने विजय मिळवला होता. यावेळीही सीएसकेसाठी हा हंगाम खास असेल, कारण महेंद्रसिंग धोनीचा हा शेवटचा आयपीएल असू शकतो.

दरम्यान, मागील हंगामातील फायनलिस्ट यांच्यात सलामीचा सामना खेळवला जाईल असे अपेक्षित होते. मात्र, तसे न करता यंदा आरसीबी आणि सीएसके यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. गतवर्षी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम सामना झाला होता.

News Title- schedule for 21 matches of IPL 2024 has been announced and the first match will be between csk and rcb
महत्त्वाच्या बातम्या –

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन; 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मोठी बातमी! शिवसेना ज्येष्ठ नेते मनोहर जोशींची प्रकृती चिंताजनक

‘धर्माच्या नावाखाली तू…’; बिग बॉस संपलं तरीही मुनव्वर फारुकी होतोय ट्रोल

मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाबाबत रोहितची पत्नी पुन्हा बोलली, म्हणाली…

पाटलाच्या पोरानं दिल्लीच्या पैलवानाला केलं चितपट; जिंकला हिंदकेसरीचा किताब