मोठी बातमी! शिवसेना ज्येष्ठ नेते मनोहर जोशींची प्रकृती चिंताजनक

Manohar Joshi | शिवसेनेची आण बाण आणि शान असलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी (Manohar Joshi) आहेत. मनोहर जोशींबाबत (Manohar Joshi) एक मोठी आपडेट समोर आली आहे. त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असून त्यांना एकदा नाहीतर दुसऱ्यांदा हिंदुजा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. वाढतं वय पाहता शरीर साथ देत नसल्याचं लक्षात आलं आहे. त्यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

ब्रेन हॅमरेजचा त्रास

याआधी देखील त्यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास होता म्हणून त्यांना हिंदुजा रूग्णालयामध्ये दाखल केलं आहे. काही दिवसांआधी त्यांची प्रकृती स्थिर होती म्हणून त्यांना डिस्चार्ज दिला. मात्र आता पुन्हा एकदा ते गंभीर आजारी असल्याने त्यांना रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.

मनोहर जोशी यांची राजकीय कारकीर्द 

मनोहर जोशींची (Manohar Joshi) राजकीय कारकीर्द ही मोठी आहे. त्यांचा राजकीय अनुभव हा प्रदीर्घ आहे. ते बाळासाहेब ठाकरे यांचे अतिशय विश्वासू होते. माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आहे. तसेच नगरसेवक, महापौर, लोकसभा अध्यक्ष, केंद्रीय मंत्री अशा सांविधानिक पदांवर त्यांनी काम केलं आहे. यामुळे त्यांच्याकडे आदराने पाहिलं जातं. वाढत्या वयामध्ये ते सध्या पक्षामध्ये दिसत नाहीत.

सुरूवातील हिंदुजा रूग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरू होते. ब्रेन हॅमरेज झाल्याने त्यांना त्रास होऊ लागला. याआधी त्यांना रूग्णालयामध्ये उपचार करण्यात आले, त्यावेळी त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्यानं त्यांना डिस्चार्ज दिल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. त्यांना ब्रेन हॅमरेज असल्याने त्यांच्या डोक्यामध्ये रक्तस्त्राव होतोय अशी माहिती समोर आली आहे.

बाळासाहेबांचे विश्वासू

मनोहर जोशी हे बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू होते. मात्र बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांना अनेकदा अपमानाचा समना करावा लागला होता. बाळासाहेबांच्या निधनानंतर दुसऱ्या वर्षी दसरा मेळाव्याला मनोहर जोशी भाषणासाठी आल्यावर त्यांना आपमानित केलं गेल्याचा प्रकार घडला आहे. भाषण करत असताना त्यांना अनेकांनी विरोध केला होता. त्यावेळी ते तिथून निघून चालले असताना त्यांना कोणीच थांबवले नाही.

मनोहर जोशींकडे राजकारणाचा अनुभव आहे. वाढतं वय पाहता त्यांना आता शरीर साथ देत नाही. म्हणूनच पक्षामध्ये नेत्यांमध्ये अधिक भरभराट झाल्यानंतर त्यांनी पक्षात येणं कमी केलं.

News Title – Manohar Joshi Latest Update

महत्त्वाच्या बातम्या

‘धर्माच्या नावाखाली तू…’; बिग बॉस संपलं तरीही मुनव्वर फारुकी होतोय ट्रोल

मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाबाबत रोहितची पत्नी पुन्हा बोलली, म्हणाली…

पाटलाच्या पोरानं दिल्लीच्या पैलवानाला केलं चितपट; जिंकला हिंदकेसरीचा किताब

यशस्वीचा यशस्वी प्रवास; मैदानावर राहून काढलेले दिवस, आता घेतलं ‘इतक्या’ कोटींचं घर

अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात?, मग ‘हे’ उपाय नक्की फॉलो करा