IPL 2024 । मुंबई इंडियन्स संघामध्ये यंदाच्या आयपीएल 2024 (IPL 2024) मध्ये हार्दिक पांड्याला विंडो ट्रेडींगच्या माध्यमातून संघामध्ये प्रवेश दिला. यामुळे मुंबई फॅन्स खूश होते. मात्र काही दिवसानंतर हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्स संघाचं कर्णधारपद द्यायचा निर्णय संघमालकाने घेतला आहे. अर्थातच यावेळी रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढण्यात आल्यानं रोहितच्या चाहत्यांनी या निर्णयाचा निषेध केला.
काही दिवसांआधी रोहित शर्माची पत्नी रितीकाने देखील मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक ब्राउचर यांच्या एका मुलाखतीला ‘हे सर्व काही चूकीचं आहे’, अशी कमेंट केली होती. आता पुन्हा एकदा रितीकाने सोशल मीडियावरील एका पोस्टवर कमेंट केली आहे.
यंदाची आयपीएल (IPL 2024) सुरू होण्याआधीच अनेक वळण घेताना दिसत आहे. हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधारपद दिल्यानं चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. याप्रकरणी रोहित शर्माच्या चाहत्यांनी मुंबई इंडियन्स संघाच्या इंस्टा हँडलला अनफॉलो केलं आहे. रोहित शर्माचं कर्णधारपद काढल्यानंतर चाहते नाराज असून आता पुन्हा एकदा रितीकाने दुसऱ्यांचा कमेंट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
रितीकाची कमेंट
इंडियन क्रिकेट कॉमेडी या इंस्टाग्राम हँडेलवर एक कविता शेअर करण्यात आली आहे. ती कविता रोहित शर्माची पत्नी रितीका सजदेहने पाहिली. या कवितेच्या पोस्टला ‘या फेसलेस कर्णधाराला आठवणीत ठेवाल ना’, अशा आशयाचे कॅप्शन दिलं आहे. यावर रितीकाने इमोशनल इमोजी कमेंट केली आहे. तिनं इमोशनल इमोजीतून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आता नेटकरी आपापल्या पद्धतीने तर्क लावत आहेत.
काय होतं कवितेत?
रोहित शर्माने शतक ठोकलं तरीही त्याने त्याचं सेलिब्रेशन केलं नाही. कारण रोहित शर्मा अंतिम सामन्यात वनडे वर्ल्डकपमध्ये पराभव झाल्याने तो आजही शांत आहे. इंग्लंडविरोधात फलंदाजांची पहिली फळी बाद झाल्यानंतर रोहित शर्माने धुरा सांभाळत 131 धावांची खेळी केली आहे. त्यानंतर अनेक यंगस्टरने चांगली कामगिरी केली आहे. त्यांचा खेळही चांगला आहे. याचं कारण म्हणजे रोहित शर्मा आहे. याच पोस्ट खाली रितीकाने इमोशनल इमोजी कमेंट केली आहे.
View this post on Instagram
आयपीएल सुरू होण्याआधीच यंदाच्या आयपीएलला अनेक वळणं मिळाली आहेत. रोहित शर्मा हार्दिक पांड्या प्रकरण हे चांगलंच तापलं होतं. मात्र रोहित शर्माने याबाबत अजूनही भ्र शब्द काढला नाही. त्यानं मौन बाळगनं पसंद केलं आहे.
News Title – IPL 2024 Rohit sharma and rohit sharma news update
महत्त्वाच्या बातम्या
यशस्वीचा यशस्वी प्रवास; मैदानावर राहून काढलेले दिवस, आता घेतलं ‘इतक्या’ कोटींचं घर
अॅसिडिटीने त्रस्त आहात?, मग ‘हे’ उपाय नक्की फॉलो करा
IPL सुरू होण्यापूर्वीच गुजरात टायटन्सला मोठा झटका; ‘हा’ बडा खेळाडू बाहेर
सून ऐश्वर्या रायसाठी अमिताभ बच्चन यांनी उचललं मोठं पाऊल!
अनिल कपूर यांच्या फिटनेसमागील नेमकं रहस्य काय?, लेकीचा मोठा खुलासा समोर