IPL 2024 | आयपीएलच्या 17 व्या मोसमाला (IPL 2024) काहीच दिवस बाकी असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएलमधील गुजरात टायटन्स संघाला मोठा झटका बसला आहे. कारण, सांघातील एक महत्वाचा खेळाडू बाहेर पडला आहे.
आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) हा आयपीएल 2024 मधून बाहेर पडला आहे. मोहम्मद शमीला डाव्या घोट्याच्या दुखापतीमुळे खेळता येणार नाहीये. त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
वर्ल्ड कप 2023 दरम्यान शमीला दुखापत झाली होती. सध्या सुरु असलेल्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतही त्याचा समावेश नाही. त्यामुळे शमी आयपीएलमध्येही खेळणार नसल्याच्या जोरदार चर्चा होत आहेत. याबाबत अधिकृत अशी कोणतीही माहिती समोर आली नाहीये. मात्र शमीच्या दुखापतीमुळे तो खेळणार की नाही, याबाबत शंका आहे.
Mohammed Shami ruled out of the IPL 2024. [PTI] pic.twitter.com/zPWhSQ5o6N
— Johns. (@CricCrazyJohns) February 22, 2024
गुजरात टायटन्सचा संघ ‘असा’ असणार
आयपीएल 2024 साठी गुजरातकडून शुभमन गिल (कर्णधार), मॅथ्यू वेड, ऋद्धीमान साहा, केन विलियमसन, डेव्हीड मिलर, अभिनव मनोहर, बी साई सुदर्शन, दर्शन नलकांडे, उमेश यादव, अजमतुल्लाह उमरझई, विजय शंकर, जयंत यादव, शाहरुख खान, राहुल तेवतिया, मानव सुथार, रॉबिन मिंज, मोहम्मद शमी, नूर अहमद, जोशुआ लिटिल, मोहित शर्मा, स्पेंसर जॉनसन, कार्तिक त्यागी, सुशांत मिश्रा, साई किशोर आणि राशिद खान, हे खेळाडू (IPL 2024) संघात असतील.
‘या’ ठिकाणी होणार IPL 2024 चे सामने
लोकसभा निवडणुकीमुळे इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) स्पर्धा कुठे होणार, याबाबत संभ्रम होता. अखेर याचा खुलासा झाला आहे. अरुण धुमल यांनी आयपीएलचे सामने भारतातच होणार असल्याचे सांगितले आहे. तसेच ही स्पर्धा येत्या 22 मार्चपासून सुरू होणार आहे. तर, अंतिम सामना 26 मे (IPL 2024) ला होण्याची शक्यता आहे.
पहिला सामना ‘या’ संघांत होणार?
आयपीएलचा पहिला सामना गतविजेता (IPL 2024) आणि उपविजेतामध्ये होतो. यामुळे यंदाही पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदाच्या सीझनमध्ये मिचेल स्टार्क हा सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला आहे. त्याच्यावर कोलकाता नाईट रायडर्स संघाने 24.75 कोटी रुपयांची बोली लावली आहे. त्यामुळे सर्वांची नजर यावेळी त्याच्या खेळीकडे असणार आहे.
News Title- Mohammed Shami ruled out of the IPL 2024
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ राशीच्या लोकांच्या वैवाहिक सुखात होईल वाढ !, पाहा आजचं राशीभविष्य
आंदोलक महिलेचे मनोज जरांगेंवर गंभीर आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ
विद्या बालन पाठोपाठ ‘या’ अभिनेत्रीची झाली ‘भूल भूलैया 3’ मध्ये एंट्री
सावधान! राज्यातील ‘या’ आठ जिल्ह्यांना बसणार अवकाळी पावसाचा फटका
‘धडा शिकवण्याची वेळ आलीये’; शरद पवारांनी केलं ‘या’ नेत्याला पाडण्याचं आवाहन