सावधान! राज्यातील ‘या’ आठ जिल्ह्यांना बसणार अवकाळी पावसाचा फटका

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maharashtra Weather Update | देशात हवामानामध्ये सतत बदल होत आहेत. बदलत्या हवामानामुळे (Maharashtra Weather Update) कधी ऊन तर कधी थंडी जाणवत आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. तसेच आरोग्याच्या बाबतीतही अनेक समस्या उद्भवत आहेत.

आता उन्हाळ्याचे चटके जाणवू लागत आहेत. अशातच पुन्हा जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला असून राज्यातील आठ जिल्ह्यांना त्याचा फटका बसणार आहे.

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात विदर्भ तसेच मराठवाड्यात जोरदार पावसासह गारपीट झाली होती. यामुळे गहू आणि हरभरा या मुख्य पिकांचे प्रचंड नुकसान झालं होतं. आता पुन्हा एकदा हवामान विभागाने इशारा दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.

‘या’ आठ जिल्ह्यांत अवकाळी पाऊस पडणार

हवामान विभागाने काही जिल्ह्यांना आतापासूनच अलर्ट दिला आहे. महाराष्ट्रातील अकोला, बुलडाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या आठ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा (Maharashtra Weather Update) अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

‘या’ तारखेपासून पावसाचा इशारा

यवतमाळ जिल्ह्यातील काही ठिकाणी हलका पाऊस बरसू शकतो. या शक्यतेमुळे विदर्भातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. काही दिवसांपुर्वीच पडलेल्या पावसामुळे अगोदरच पिकांचे नुकसान झाले आहे, आता पुन्हा पाऊस पडणार म्हटल्यावर शेतकऱ्यांच्या दुखण्यावर मीठ चोळल्यासारखीच परिस्थिती उद्भवणार आहे.

हवामान विभागाने येत्या 25 फेब्रुवारीला राज्यातील (Maharashtra Weather Update) आठ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यापुर्वी हवामान कोरडे राहील. येत्या रविवारी काही ठिकाणी अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे.

News Title – Maharashtra Weather Update  

महत्त्वाच्या बातम्या –

रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी अडकले लग्नबंधनात!

बॉलिवूडमधील आणखी एका कपलमध्ये मतभेद?, घटस्फोट घेणार?

अजय महाराज बारस्कर यांच्याबद्दल धक्कादायक माहिती समोर!

अजिंक्य रहाणेच्या घरी आली आलिशान कार; किंमत जाणून बसेल धक्का

लोकसभा निवडणूक: निवडणूक आयोगाने शुभमन गिलवर सोपवली मोठी जबाबदारी!