रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी अडकले लग्नबंधनात!

Rakul Preet-Jackky Wedding

Rakul Preet-Jackky Wedding | गेल्या बऱ्याच दिवसांपासून अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांच्या लग्नाची चर्चा होती. गोव्यात त्यांनी शानदार पद्धतीने विवाह केला आहे. लग्नातील फोटो नुकतेच समोर आले आहेत. रकुल प्रीत आणि जॅकीने प्रथम शीख रितीरिवाजांनुसार सेरेमनी फॉलो करत लग्न केले आणि नंतर सिंधी (Rakul Preet-Jackky Wedding) रितीरिवाजांनुसार त्यांनी पुन्हा लग्न केले.

गोव्यामध्ये मोठ्या थाटामाटात दोघांनी विवाह केला. या विवाहाला त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे काही मित्र-मंडळी उपस्थित होते. लग्नानंतर मुंबईत रकुल- जॅकी मोठं रिसेप्शन देणार असल्याचं वृत्त आहे. दोघांच्या चाहत्यांना या बातमीमुळे प्रचंड आनंद झाला आहे.

रकुल प्रीत सिंग अडकली लग्नबंधनात

रकुल आणि जॅकीने लग्नाचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. याला त्यांनी ‘माईन अँड फॉरेवर’ #abdonobhagna-ni असं कॅप्शन दिलं आहे. रकुलने लग्नात पेस्टल गुलाबी रंगाचा लेहेंगा घातला होता. तर जॅकीने शेरवानी परिधान केली होती. दोघांच्या फोटोवर आता अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. चाहते त्यांना भरभरून शुभेच्छा देत आहेत.

19 फेब्रुवारीपासून त्यांच्या लग्नाचे फंक्शन्स सुरू झाले. पहिले त्यांचा हळदी समारंभ झाला, त्यानंतर होणाऱ्या (Rakul Preet-Jackky Wedding) वधूच्या हातावर सुंदर मेहंदी काढण्यात आली. त्यानंतर झालेल्या संगीतमध्ये जॅकी आणि रकुलेने जोरदार डान्स करत आनंद लुटला आणि काल (21 फेब्रुवारी) दोघांचा विवाह सोहळा पार पडला.

विवाहाला अनेक सेलिब्रिटींची उपस्थिती

रकुल आणि जॅकीच्या लग्नाला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. वरुण धवन पत्नी नताशा दलालसोबत लग्नात सहभागी होण्यासाठी आला होता. तसेच, अर्जुन कपूर, रवी किशन, आयुष्मान खुराना, राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्यासह दिग्गज बॉलिवूड स्टार्स गोव्यात पोहोचले आणि त्यांनी रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांच्या लग्नाला हजेरी लावली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

रकुल प्रीत (Rakul Preet-Jackky Wedding) आणि जॅकी दोघेही बऱ्याच दिवसांपासून नात्यात होते. त्यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. तेव्हापासून या दोघांना विविध पार्ट्यांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहिलं गेलं. आपल्या नात्याबाबत रकुलने अनेक खुलासेही केले होते. आता त्यांनी विवाह करत कायमची गाठ बांधली.

News Title –  Rakul Preet-Jackky Wedding

महत्त्वाच्या बातम्या –

अजय महाराज बारस्कर यांच्याबद्दल धक्कादायक माहिती समोर!

अजिंक्य रहाणेच्या घरी आली आलिशान कार; किंमत जाणून बसेल धक्का

लोकसभा निवडणूक: निवडणूक आयोगाने शुभमन गिलवर सोपवली मोठी जबाबदारी!

मंदिरावरही लागणार ‘कर’, ‘हिंदूविरोधी’ म्हणत काँग्रेस-भाजपमध्ये जुंपली!

IPL फायनलची तारीख ठरली; धोनीच्या गडातून होणार स्पर्धेची सुरूवात!

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .