अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात?, मग ‘हे’ उपाय नक्की फॉलो करा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Acidity tips | बऱ्याच जणांनाअ‍ॅसिडिटीचा प्रचंड त्रास होत असतो. अ‍ॅसिडिटीमुळे (Acidity tips ) काही खाण्याची इच्छाच उरत नाही. यासोबतच छातीत जळजळ, आंबट ढेकर येणे, छातीत दुखणे, घशात काहीतरी अडकल्याची भावना आणि वारंवार पोटात पेटके येणे हा त्रासदेखील जाणवतो.

अ‍ॅसिडिटीपासून आराम मिळवायचा असेल तर, तुम्ही काही उपाय नक्की फॉलो करू शकता. यामुळे तुम्हाला बराच आराम मिळेल. मात्र, हा त्रास अधिक जाणवत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचं आहे.

आपण जेवणात काय खात आहोत, तसेच जेवणाची वेळ या सर्व गोष्टी आपल्या आरोग्यावर प्रभाव पाडतात. आपण अनेकदा आपल्याला वाटेल तेव्हा खातो त्यातच बाहेरचे अन्न जास्त खातो. स्ट्रीट फूड किंवा मसालेदार पदार्थ चवीला छान लागतात पण त्यामुळे ॲसिडिटीचा त्रास लवकर होतो.यासाठी आता तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता.

अ‍ॅसिडिटीच्या त्रासासाठी ‘हे’ उपाय करून पाहा

तुम्ही दिवसाची सुरुवात (Acidity tips ) कोमट पाणी पिऊन करू शकता.
जेवण झाल्यानंतर तुम्ही बडीशेप खाऊ शकता.
पोट फुगले असं वाटत असल्यास तुम्ही जिऱ्याचे पाणी पिऊ शकता.
आहारात दहीचा समावेश करावा.
जेवण झाल्यानंतर केळी खाणे, केळीमध्ये पोटॅशियम असते जे अ‍ॅसिड शांत करते.
तुम्ही कोमट पाण्यामध्ये ओवा देखील खाऊ शकता.
कोमट पाण्याबरोबर चिमूटभर हिंग घ्या.
आल्याचे तुकडे पाण्यात उकळून ते पाणी घेतल्यासही आराम मिळतो.

हे घरगुती उपाय करून तुम्ही अ‍ॅसिडिटीपासून (Acidity tips ) आराम मिळवू शकता. यासोबतच आहारात कढीपत्त्याचा समावेश करू शकता. कढीपत्ता असा खाल्ल्या जात नाही, त्यामुळे तुम्ही कढीपत्त्याचे पराठे बनवूनही खाऊ शकता. रोज कढीपत्ता खाल्ल्याने अ‍ॅसिडिटीचा त्रास कमी होतो. मात्र, जास्त त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे.

News title – Acidity tips   

महत्वाच्या बातम्या- 

‘धडा शिकवण्याची वेळ आलीये’; शरद पवारांनी केलं ‘या’ नेत्याला पाडण्याचं आवाहन

महाराष्ट्रातील आणखी एका कंपनीचा गुजरातकडे जाण्याच्या मार्ग मोकळा!

रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी अडकले लग्नबंधनात!

बॉलिवूडमधील आणखी एका कपलमध्ये मतभेद?, घटस्फोट घेणार?

अजय महाराज बारस्कर यांच्याबद्दल धक्कादायक माहिती समोर!