आंदोलक महिलेचे मनोज जरांगेंवर गंभीर आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maratha reservation | मनोज जरांगे पाटील हे मराठा आंदोलनासाठी गेल्या काही दिवसांपासून सरकारकडे आरक्षणाची (Maratha reservation) मागणी करत आहेत. सरकार त्यांना आरक्षणाचं आश्वासन देत आहेत. आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आरक्षणासाठी आंदोलन करणार असल्याचं ते म्हणाले आहेत. अशामध्ये आता काल मनोज जरांगेंवर बारसकर महाराज यांनी गभीर आरोप केले. त्यानंतर आता काही मराठा बांधव हे मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करताना दिसत आहेत. (Maratha reservation)

मनोज जरांगे पाटील यांच्यावर मराठा आंदोलक बारसकर महाराज यांनी गंभीर आरोप केले होते. आता जरांगेंवर मराठा आंदोलकच आरोप करताना दिसत आहेत. एका महिला आंदोलकर्त्यांनी मनोज जरांगें यांना बड्या नेत्याचा फोन येत असल्याचं म्हटलं आहे. यामुळे मराठा आरक्षणाला येत्या काळामध्ये एक वेगळं वळण मिळू लागलं असल्याची माहिती समोर आली आहे. संगीता वानखेडे असं त्या आंदोलनकर्त्या महिलेचं नाव असून मनोज जरांगे हे बड्या नेत्यांच्या ऐकण्यावरून वागत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. (Maratha reservation)

“शरद पवार मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी”

“मनोज जरांगे पाटील यांना शरद पवार यांचा फोन येतो. ते शरद पवार यांच्या सांगण्यावरून वागतात. पुण्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचे बॅनर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लावले होते. जेव्हा मराठा आरक्षण देण्यात येणार असल्याचं सांगितलं तेव्हा कानाडोळा केला. त्यावेळी मनोज जरांगे देखील टोपी घालत अख्ख पुणे फिरले आहेत. यामुळे आता मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी हे शरद पवार”, असल्याचं वानखेडे म्हणाल्या आहेत.

मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्राच्या जनतेला वेड बनवलं होतं. अंतरवाली सराटीमध्ये दंगल घडवली होती की घडली होती. याचा सरकारने शोध घ्यावा. मनोज जरांगे पाटील हे कोण आहेत हे माहिती नव्हतं. हे मीडियामुळे माहिती पडू लागलं आहे. मी भोळा भाबडा माणूस समजून त्यांच्यावर विश्वास ठेवला. पण आता परिस्थिती बदलली आहे. मी त्यांचा विरोध करतेय, असं वानखेडे म्हणाल्या आहेत.

“शरद पवारांचा जरांगेंना फोन”

मी गेली एक ते दीड महिने विरोध करत आहे. सोशल मीडियावर विषाची बॉटल घेऊन बसते. जरांगे कोणालाही विश्वासात घेत नव्हते. केवळ एकाचा फोन येत होता त्याला विश्वासात घेत होते. मनोज जरांगेंना शरद पवार यांचा फोन येतो आणि ते त्यांनाच विश्वासात घेत होते, असं जरांगे म्हणालेत.

अजय महाराज बारसकर यांनी देखील मनोज जरांगेंवर आरोप केले होते. यामुळे त्यांना प्रहार जनशक्ती आमदार बच्चू कडू यांच्या पक्षातून बडतर्फ केले. त्यानंतर आता मराठा आंदोलनकर्त्या संगीता वानखेडे यांनी देखील जरांगेंवर आरोप केला आहे.

Maratha reservation in sangita wankhede on manoj jarange patil

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! राज्यातील ‘या’ आठ जिल्ह्यांना बसणार अवकाळी पावसाचा फटका

‘धडा शिकवण्याची वेळ आलीये’; शरद पवारांनी केलं ‘या’ नेत्याला पाडण्याचं आवाहन

महाराष्ट्रातील आणखी एका कंपनीचा गुजरातकडे जाण्याच्या मार्ग मोकळा!

रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी अडकले लग्नबंधनात!

बॉलिवूडमधील आणखी एका कपलमध्ये मतभेद?, घटस्फोट घेणार?