पाटलाच्या पोरानं दिल्लीच्या पैलवानाला केलं चितपट; जिंकला हिंदकेसरीचा किताब

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Hindkesari Kusti 2024 | देशामध्ये कुस्ती या खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. देशातील असे अनेक राज्य आहेत तिथं पैलवान घडतात. देशामध्ये हिंदकेसरी या कुस्ती (Hindkesari Kusti 2024) स्पर्धेला वेगळं महत्त्व आहे. हिंदकेसरी स्पर्धा ही तेलंगणा येथे पार पडली आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या पैलवानाने मैदान मारलं आहे. राज्यासाठी ही गर्वाची बाब आहे. दिल्लीतील बोल्लू पैलवानाला आस्मान दाखवत त्याला चितपट केलं.

महाराष्ट्रासाठी अतिशय गर्वाची बाब आता समोर आली आहे. महाराष्ट्राचा मल्ल समाधान पाटीलने तेलंगणा येथे झालेल्या हिंदकेसरी स्पर्धेमध्ये दिल्लीच्या पैलवानाला आस्मान दाखवलं असून चारी मुंड्या चित केलं आहे. यास्पर्धेकडे देशातील कुस्ती शैकीनांचे लक्ष लागले होते. (Hindkesari Kusti 2024)

हिंद केसरी 2024 ही कुस्ती स्पर्धा (Hindkesari Kusti 2024) तेलंगणामध्ये पार पडली. यामध्ये देशभरातून अनेक मल्लांनी सहभाग घेतला होता. यामध्ये अंतिम लढत ही राज्यातील सोलापूरच्या समाधान पाटील आणि दिल्लीचा बोल्लू खत्री यांच्यामध्ये झाली. दोन्ही मल्ल एकमेकांविरोधात डावपेच टाकत होते. कुस्ती निकाली लागेपर्यंत काळजाचे ठोके चुकू लागले होते. कुस्ती निकाली लागेपर्यंत समाधान पाटीलनं पैलवान बल्लूला अडकवत चितपट केलं. महाराष्ट्राला सलग दुसऱ्या हिंदकेसरीचा किताब मिळाला आहे. (Hindkesari Kusti 2024)

Hind Kesari | महाराष्ट्रातील पैलवानाने मारले हिंद केसरीचे मैदान, बोलू खत्रीचा पराभव करत समाधान पाटील राष्ट्रीय विजेते

सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्राला हिंदकेसरी किताब

महाराष्ट्र राज्याला सलग दुसऱ्या वर्षी हिंदकेसरीचा किताब मिळाला आहे. पहिल्या वर्षी म्हणजेच गतवर्षी अभिजीत कटकेनं हरियाणातील पैलवान सोमवीरला चितपट करत आस्मान दाखवत हिंद केसरीची गदा घेत किताब मिळवला. यंदा समाधान पाटीलने दिल्लीच्या पैलवानाला चारी मुंड्या चित करत हिंदकेसरीचा किताब मिळवला आहे.

समाधान पाटील हा पैलवान सिकंदर शेखच्या मोहोळ तालुक्यातील पैलवान आहे. सोलापूर तालुक्यातील असून तो एका शेतकरी कुटुंबातील आहे. बिकट परिस्थीतीतून त्यानं मार्ग काढत कुस्ती क्षेत्रामध्ये हिंद केसरी किताबावर आपलं नाव कोरलं आहे.

महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी एकाच तालुक्यात

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यामध्ये महाराष्ट्र केसरी म्हणून नावारूपाला आलेला पैलवान म्हणजे सिकंदर शेखची ओळख आहे. तर त्याच तालुक्यातील समाधान पाटील हा हिंद केसरी किताबाचा मानकरी म्हणून पैलवान आहे. मोहोळ तालुक्यामध्ये महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी असे दोन किताब सोलापूरच्या मातीला मिळाले.

News Title – Hindkesari Kusti 2024 competition at Telangana

महत्त्वाच्या बातम्या

रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी अडकले लग्नबंधनात!

बॉलिवूडमधील आणखी एका कपलमध्ये मतभेद?, घटस्फोट घेणार?

अजय महाराज बारस्कर यांच्याबद्दल धक्कादायक माहिती समोर!

अजिंक्य रहाणेच्या घरी आली आलिशान कार; किंमत जाणून बसेल धक्का

लोकसभा निवडणूक: निवडणूक आयोगाने शुभमन गिलवर सोपवली मोठी जबाबदारी!