माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन; 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Manohar Joshi | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांचे निधन झाले आहे. त्यांनी आज पहाटे 3 वाजता मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. 21 फेब्रुवारी रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशी माहिती कौटुंबिक सूत्रांनी दिली. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. पण वयाच्या 86 व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, मनोहर जोशी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी माटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेज जवळील W54 या त्यांच्या सध्याच्या निवासस्थानी सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत ठेवणण्यात येणार असल्याचे कळते. त्यानंतर अंत्ययात्रा सुरू होईल. दादर येथील स्मशान भूमीत त्यांना अखेरचा निरोप दिला जाईल.

86 व्या वर्षी मृत्यू

मनोहर जोशी यांना याआधी देखील त्यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास होता म्हणून त्यांना हिंदुजा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. काही दिवसांआधी त्यांची प्रकृती स्थिर होती म्हणून त्यांना डिस्चार्ज दिला. मात्र आता पुन्हा एकदा गंभीर आजारी असल्याने त्यांना रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले पण आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

मनोहर जोशी हे शिवेसना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू होते. मात्र बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांना अनेकदा अपमानाचा सामना करावा लागल्याचे पाहायला मिळाले. बाळासाहेबांच्या निधनानंतर दुसऱ्या वर्षी दसरा मेळाव्याला मनोहर जोशी भाषणासाठी आल्यावर त्यांना आपमानित केले गेल्याचा प्रकार घडला होता.

 

Manohar Joshi | बाळासाहेबांचे विश्वासू

भाषण करत असताना त्यांना अनेकांनी विरोध केला होता. त्यावेळी ते तिथून निघून चालले असताना त्यांना कोणीच थांबवले नाही. मनोहर जोशींची राजकीय कारकीर्द ही मोठी आहे. त्यांचा राजकीय अनुभव हा प्रदीर्घ होता. त्यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 ला रायगड जिल्ह्यातील नांदवी गावी झाला. 1995 या वर्षी ते युतीच्या सत्तेत मुख्यमंत्री होते.

मनोहर जोशी बाळासाहेब ठाकरे यांचे अतिशय विश्वासू होते. माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याचा कारभार सांभाळला आहे. तसेच नगरसेवक, महापौर, लोकसभा अध्यक्ष, केंद्रीय मंत्री अशा सांविधानिक पदांवर त्यांनी काम केले. वाढत्या वयानुसार त्यांनी राजकारणातून काढता पाय घेतला होता.

News Title- Former Chief Minister of Maharashtra Manohar Joshi has passed away
महत्त्वाच्या बातम्या –

‘धर्माच्या नावाखाली तू…’; बिग बॉस संपलं तरीही मुनव्वर फारुकी होतोय ट्रोल

मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाबाबत रोहितची पत्नी पुन्हा बोलली, म्हणाली…

पाटलाच्या पोरानं दिल्लीच्या पैलवानाला केलं चितपट; जिंकला हिंदकेसरीचा किताब

यशस्वीचा यशस्वी प्रवास; मैदानावर राहून काढलेले दिवस, आता घेतलं ‘इतक्या’ कोटींचं घर