शेतकरी आंदोलन! जिममध्ये व्यायाम करताना DSP यांना हृदयविकाराचा झटका, जागीच मृत्यू

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Farmers Protest | शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा देशाची राजधानी दिल्लीच्या दिशेने कूच केली आहे. विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी केंद्र सरकारविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन काही प्रमाणात हिंसक होत असल्याचे दिसते. पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने अधिक फौजफाटा तैनात केला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे हरयाणा आणि पंजाबच्या खनौरी सीमेवर तैनात असलेल्या डीएसपीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. डीएसपी दिलप्रीत सिंग जिममध्ये व्यायाम करत होते. पंजाब पोलिसांच्या डीजीपींनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डीएसपी दिलप्रीत सिंग (50) मालेरकोटला येथे तैनात होते, मात्र सध्या त्यांची ड्युटी खनौरी सीमेवर होती. लुधियाना-फिरोजपूर रोडवरील भाई बाला चौकाजवळील हॉटेलच्या जिममध्ये ते व्यायाम करत होते. यादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

DSP यांना हृदयविकाराचा झटका

लुधियानाचे रहिवासी असलेले दिलप्रीत सिंग नियमितपणे जिममध्ये जात असत. याआधी त्यांनी लुधियानामध्ये एसीपी म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या सहकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दिलप्रीत त्यांच्या तब्येतीबाबत खूप जागरूक होते. ते कधीच जिमला जायला विसरायचे नाहीत. सायंकाळी चारच्या सुमारास ते जिममध्ये पोहोचले. व्यायाम करत असताना त्यांना छातीत दुखू लागल्याने ते अचानक कोसळले. त्यांच्या गनमॅनने इतर जिम सदस्यांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू दिलप्रीत सिंग 1992 मध्ये सहाय्यक उपनिरीक्षक (ASI) म्हणून पोलीस दलात दाखल झाले. त्यांनी पंजाबमधील विविध पोलीस ठाण्यात सेवा बजावली आणि नंतर त्यांना सहायक पोलीस अधीक्षक म्हणून बढती मिळाली. तसेच त्यांची बहीण देखील आंतरराष्ट्रीय जलतरणपटू राहिली आहे.

Farmers Protest | पोलिसांचा मोठा फौजफाटा

दरम्यान, त्यांच्या सेवेदरम्यान त्यांनी अनेक किचकट प्रकरणे सोडवली, त्यातील सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने एका बडतर्फ केलेल्या सैनिकाच्या अटकेसह बनावट लष्करी नोकरीचा घोटाळा उघडकीस आणला. या टोळीने अनेक तरुणांना सैन्यात नोकरी देण्याच्या नावाखाली फसवले होते. दिलप्रीत यांनी त्यांच्या टीमसह स्थानिक ज्वेलर्स आणि त्याच्या पत्नीच्या दुहेरी हत्या प्रकरणाची उकल केली होती.

पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव अरोरा यांनी डीएसपींच्या निधनावर शोक व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, काल आम्ही आमचे शूर डीएसपी दिलप्रीत सिंग यांना गमावले. ते खनौरी सीमेवर तैनात होते. ते 31 वर्षांपासून पंजाब पोलिसात कार्यरत होते. या दुःखाच्या प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबीयांसोबत उभे आहोत.

News Title- DSP Dilpreet Singh, posted on the Khanauri border of Haryana and Punjab, died of a heart attack due to the farmers’ agitation
महत्त्वाच्या बातम्या –

पत्नी दारू पिऊन धिंगाणा घालते, सतत पैसे मागते; पीडित पतीची पोलिसांत धाव

मृणाल ठाकूरला दिग्गदर्शकाने चित्रपट नाकारला; अभिनेत्रीनं सांगितलं धक्कादायक कारण

प्रतीक्षा संपली! IPL च्या 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर; लवकरच CSK vs RCB थरार

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन; 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मोठी बातमी! शिवसेना ज्येष्ठ नेते मनोहर जोशींची प्रकृती चिंताजनक