गुड न्यूज! सोने-चांदीचे भाव उतरले, जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Gold-Silver Rate Today | सोने-चांदीच्या किमती कमी-जास्त होतानाचा ट्रेंड या दोन महिन्यात दिसून आला. आठवड्याच्या सुरुवातीला (Gold-Silver Rate Today) आणि शेवटी सोन्याच्या किमती वधारताना दिसल्या. आज (23 फेब्रुवारी) ग्राहकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.

आज चांदीची किंमत दणकावून आपटली. तर सोन्याने देखील दिलासा दिला आहे. त्यामुळे सराफा बाजारात आज ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात सोन्यात 900 रुपयांची घसरण दिसून आली तर चांदी 1500 रुपयांनी महागली होती. आज सोने आणि चांदी दोन्हीचे भाव उतरले आहेत.

आजचे सोने-चांदीचे दर-

आठवड्याच्या शेवटी म्हणजेच 16 फेब्रुवारी रोजी सोन्याच्या भावात 200 तर 17 फेब्रुवारी रोजी 100 रुपयांची वाढ झाली. दोन दिवसांत सोने 300 रुपयांनी महागले. तर 19 फेब्रुवारी रोजी सोने 270 रुपयांनी वधारले.

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), आजच्या (Gold-Silver Rate Today) सोने-चांदीच्या कॅरेटनुसार किंमती ठरल्या आहेत. त्यानुसार आता 22 कॅरेट सोने 57,650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,880 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

चांदीचे भाव उतरले

गेल्या आठवड्यात चांदीत चढउताराचे सत्र दिसून आले. चांदीच्या किमती 16 फेब्रुवारी (Gold-Silver Rate Today ) रोजी 1100 रुपयांनी वधारल्या. 17 फेब्रुवारी रोजी 900 रुपयांनी किंमती वधारल्या होत्या. तर आज गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 75,000 रुपये आहे.

‘असा’ असेल कॅरेटचा भाव

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 62,155 रुपये, 23 कॅरेट 61,906 रुपये, 22 कॅरेट सोने 56,934 रुपये झाले. 18 कॅरेट 46,616 रुपये, 14 कॅरेट सोने 36,361 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे.

News Title | Gold-Silver Rate today 23 feb  

महत्त्वाच्या बातम्या –

पत्नी दारू पिऊन धिंगाणा घालते, सतत पैसे मागते; पीडित पतीची पोलिसांत धाव

मृणाल ठाकूरला दिग्गदर्शकाने चित्रपट नाकारला; अभिनेत्रीनं सांगितलं धक्कादायक कारण

प्रतीक्षा संपली! IPL च्या 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर; लवकरच CSK vs RCB थरार

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन; 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मोठी बातमी! शिवसेना ज्येष्ठ नेते मनोहर जोशींची प्रकृती चिंताजनक