ईशा देओलनंतर ‘ही’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्री झाली पतीपासून विभक्त

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manasi Naik Divorce | मराठी इंडस्ट्रीमधूनही (Manasi Naik Divorce) एक मोठी बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री ईशा देओलने पती भरत तख्तानीला घटस्फोट दिला. त्यातच अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यातही बिनसल्याच्या चर्चा आहेत.

अशातच मराठी अभिनेत्री मानसी नाईक हीनेदेखील घटस्फोट घेतल्याचं समोर आलं आहे. मानसी नाईक आणि तिचा पती प्रदिप खरेरा यांच्यातही अनेक दिवसांपासून वाद असल्याचं म्हटलं जात होतं. दरम्यान, आता अभिनेत्रीला घटस्फोट मिळाला आहे. घटस्फोट मिळाल्यानंतर तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.

मानसी नाईक-प्रदीप खरेरा यांचा घटस्फोट

मानसीने प्रदीप खरेरा याला अनफॉलो केल्यापासून त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगत होत्या. यानंतर मानसी नाईक हिने यावर भाष्य करत घटस्फोट घेत असल्याच्या चर्चेला दुजोरा दिला होता. यावेळी तिने (Manasi Naik Divorce) घटस्फोटाचं कारण देखील स्पष्ट केलं होतं.

आता मानसीने एक नवीन पोस्ट शेअर करून आपल्याला घटस्फोट मिळाल्याचं सांगितलं आहे. यासोबत तिने आपण आपल्या आयुष्याची नव्याने सुरुवात करत असल्याचं देखील म्हटलं आहे. मानसीने स्वतःचे काही फोटोदेखील पोस्ट केले आहेत.

मानसी नाईकची पोस्ट

‘मी आता भूतकाळामधील सगळ्या गोष्टींमधून मुक्त झाले आहे. प्रत्येक पाऊल पुढे टाकताना माझं बळ वाढत आहे. जुन्या गोष्टींना निरोप आणि आयुष्यातील पुढच्या वाटचालींचं स्वागत. भूतकाळामध्ये रमून राहण्यासाठी आयुष्य खूप लहान आहे. मी फक्त वर्तमान आणि भविष्यासाठी जगते. या संपूर्ण प्रवासामध्ये माझ्या पाठिशी जे खंबीरपणे उभे राहिले त्यांचे मनापासून आभार. आयुष्याची नवी सुरुवात’, अशी पोस्ट मानसी नाईकने (Manasi Naik Divorce) केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manasi Naik (@manasinaik0302)

यासोबतच तिने डिवोर्स जर्नी, फायनली ऑल ओव्हर, खूप आनंदी, नवी सुरुवात, #ThankYou #Grateful #grattitude असे हॅशटॅगदेखील वापरले आहेत. मानसीने पॅरिसच्या आयफेल टॉवरसमोर केलेलं फोटोशूट शेअर करत ही माहिती दिली आहे.

News Title-  Manasi Naik Divorce

महत्त्वाच्या बातम्या –

पंकजा मुंडे ‘या’ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार?

भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन; वयाच्या 59 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

महिला आमदाराचा कार अपघातात मृत्यू; 33 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न मनोहर जोशींच्या रूपानं पूर्ण झालं – राज ठाकरे

शेतकरी आंदोलन! जिममध्ये व्यायाम करताना DSP यांना हृदयविकाराचा झटका, जागीच मृत्यू