मोठी बातमी! 33 वर्षीय महिला आमदाराचा भीषण अपघातात मृत्यू

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Accident | तेलंगणामधील सिकंदराबाद येथील भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) आमदार लस्या नंदिता यांचा आज सकाळी पतनचेरू ओआरआर येथे कार अपघातात मृत्यू झाला. (Lasya Nanditha Died) मिळालेल्या माहितीनुसार, त्यांची कार दुभाजकाला धडकली. बीआरएस प्रमुख के.चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. या प्रकरणाबाबत अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. अपघात एवढा भीषण होता की गाडीचा चाकाचुरा झाला.

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी देखील आमदार लस्या नंदिता यांच्या अकाली निधनाने मोठा धक्का बसला असल्याचे म्हटले. सिकंदराबाद कॅन्टोन्मेंटमधील बीआरएस आमदार लस्या नंदिता यांचा आज सकाळी पतनचेरू ओआरआर येथे कार अपघातात मृत्यू झाला. माहितीनुसार, त्यांची कार दुभाजकाला धडकली.

महिला आमदाराचा अपघातात मृत्यू

भारत राष्ट्र समितीच्या (BRS) आमदार लस्या नंदिता यांचा शुक्रवारी सकाळी हैदराबादजवळ झालेल्या अपघातात मृत्यू झाला. त्या 33 वर्षांच्या होत्या. पतनचेरूजवळ आऊटर रिंग रोडवर (ओआरआर) जात असलेली त्यांची कार रस्त्याच्या दुभाजकाला धडकल्याने हा अपघात झाला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे.

अलीकडेच झालेल्या निवडणुकीत लस्या नंदिता सिकंदराबाद कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. त्यांचे वडील आणि सिकंदराबाद मतदारसंघाचे पाचवेळा आमदार राहिलेल्या सायन्ना यांचे 19 फेब्रुवारी 2023 रोजी आजारपणामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुली असा परिवार होता. बीआरएसने 30 नोव्हेंबरच्या विधानसभा निवडणुकीत सायन्ना यांची मोठी मुलगी लस्या नंदिता यांना उमेदवारी दिली होती.

 

Accident अन् काळाचा घाला

खरं तर बीआरएस अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या जाहीर सभेला उपस्थित राहण्यासाठी नलगोंडा येथे जात असताना 13 फेब्रुवारी रोजी नरकेतपल्ली येथे झालेल्या अपघातातून आमदार नंदिरा या थोडक्यात बचावल्या होत्या. या अपघातात एका होमगार्डचा मृत्यू झाला होता.

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी म्हटले की, कॅन्टोन्मेंटच्या आमदार लस्या नंदिता यांच्या अकाली निधनाने मला खूप धक्का बसला आहे. नंदिता यांचे वडील दिवंगत सायन्ना यांच्याशी माझे जवळचे नाते होते. मागच्या वर्षी याच महिन्यात त्यांचे निधन झाले. त्याच महिन्यात नंदिताचा यांचाही अचानक मृत्यू झाला हे खूप दु:खद आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या मनापासून संवेदना. त्यांच्या आत्म्याला शांती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

News Title- Bharat Rashtra Samithi MLA from Secunderabad in Telangana Lasya Nandita died in a car accident at Pathancheru ORR this morning
महत्त्वाच्या बातम्या –

बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न मनोहर जोशींच्या रूपानं पूर्ण झालं – राज ठाकरे

शेतकरी आंदोलन! जिममध्ये व्यायाम करताना DSP यांना हृदयविकाराचा झटका, जागीच मृत्यू

पत्नी दारू पिऊन धिंगाणा घालते, सतत पैसे मागते; पीडित पतीची पोलिसांत धाव

मृणाल ठाकूरला दिग्गदर्शकाने चित्रपट नाकारला; अभिनेत्रीनं सांगितलं धक्कादायक कारण

प्रतीक्षा संपली! IPL च्या 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर; लवकरच CSK vs RCB थरार