भाजप आमदाराचं निधन; वयाच्या 59 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

MLA Rajendra Patni Passed Away | वाशिम जिल्ह्यातील कारंजा विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांनी आज (23 फेब्रुवारी) वयाच्या 59 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन-तीन वर्षांपासून आजारी असल्याने त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते.

त्यातच आज त्यांची प्राणज्योत मालवली. राजेंद्र पाटणी यांच्या निधनाने राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. भाजपामधील अनेक नेते सोशल मिडियाद्वारे त्यांना आदरांजली अर्पण करत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्वीटरवर पोस्ट करत आदरांजली दिली आहे.

देवेंद्र फडणवीसांचा ट्वीटद्वारे शोक

“अत्यंत दुःखद बातमी: विधानसभेतील माझे सहकारी राजेंद्र पाटणीजी (MLA Rajendra Patni Passed Away) यांचे आज निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. ते या संकटातून बाहेर पडतील, अशी आम्हा सर्वांना आशा होती. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली. ग्रामीण प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी भाजपाने गमावला आहे. पश्चिम विदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा कायम पुढाकार असायचा. सिंचनाचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे, म्हणून ते सतत आग्रही असायचे. त्यांचे निधन ही माझी वैयक्तिक हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.”, अशी पोस्ट करत देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे.

राजेंद्र पाटणी यांच्या निधनाने हळहळ

राजेंद्र पाटणी (MLA Rajendra Patni Passed Away) यांनी प्रथम शिवसेना पक्षामधून विजय मिळविला होता. पुढे त्यांनी ‘मोदी लाटेत’ भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपात गेल्यानंतर त्यांनी वाशिम जिल्हाध्यक्षपदासह आमदारकी मिळवली. अनेक दिवसांपासून आजारी असल्याने त्यांचे पुत्र ज्ञानक पाटणी राजकारणात सक्रिय दिसून आले.

अनेक विकास कामाचे भूमिपूजन देखील ज्ञानक पाटणी यांनी केले.त्यामुळे आता भाजपाकडून ज्ञानक पाटणी 2024 निवडणूक मध्ये नवीन चेहरा असल्याची चर्चा होत आहे. मागील वर्षभरापासून त्यांचा मतदार संघातील वाढता सहभाग चर्चेचा विषय बनला आहे.

News Title-  MLA Rajendra Patni Passed Away

महत्त्वाच्या बातम्या –

महिला आमदाराचा कार अपघातात मृत्यू; 33 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न मनोहर जोशींच्या रूपानं पूर्ण झालं – राज ठाकरे

शेतकरी आंदोलन! जिममध्ये व्यायाम करताना DSP यांना हृदयविकाराचा झटका, जागीच मृत्यू

पत्नी दारू पिऊन धिंगाणा घालते, सतत पैसे मागते; पीडित पतीची पोलिसांत धाव

मृणाल ठाकूरला दिग्गदर्शकाने चित्रपट नाकारला; अभिनेत्रीनं सांगितलं धक्कादायक कारण