पंकजा मुंडे ‘या’ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pankaja Munde | राज्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्ष याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. यंदाची लोकसभा निवडणूक ही आतापर्यंतची वेगळी निवडणूक ठरणार आहे. कारण या निवडणुकीआधी सर्वच चित्र पालटलेलं पहायला मिळत आहे. कारण आता भाजपसोबत राष्ट्रवादी काँग्रेस गेल्याने भाजपला आणखी बळकटी मिळाली आहे. बारामतीप्रमाणे बीड मतदारसंघाची चर्चा आहे. यावर आता पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी भाष्य केलं आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांमध्ये जागावाटपावरून चर्चा सुरू आहेत. बारामती लोकसभा निवडणुकीची सर्वत्र चर्चा आहे. बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटातून सुप्रिया सुळे उमेदवार आहेत. तर त्यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढणार आल्याच्या चर्चा आहेत. अशातच आता आणखी एका मतदारसंघाची चर्चा आहे तो म्हणजे बीड मतदारसंघ. यावर आता पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी स्पष्टोक्ती दिली आहे.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

आगामी लोकसभेमध्ये पंकजा मुंडे (Pankaja Munde) लोकसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा आहेत. यावर आता स्वतः पंकजा मुंडे यांनी माहिती दिली आहे. ‘लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या कार्यकर्ते चांगले काम करत आहेत. याच कार्यकर्त्यांनी 2014 आणि 2019 मध्ये माझ्या बाजूने काम केलं आहे. त्यामुळे उमेदवाराबाबत निर्णय येणाऱ्या काळात निश्चित होईल”, असं पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या आहेत.

“मराठा बांधवांनी ठरवावं किती आरक्षण हवं”

“आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा, धनगर आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न पेटलेला आहे. याचा लोकसभा निवडणुकीवर मोठा परिणाम होणार नाही. मराठा समाजाने ठरवावं त्यांना किती आरक्षण हवं आहे की नाही”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

“आगामी राजकीय काळ महिलांचा”

“आगामी राजकीय काळामध्ये महिला असतील. येणारा राजकारणातील काळ हा महिलांचा आहे. येत्या काळात महिलाच सत्याचं राजकारण करतील”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

News Title – Pankaja Munde On Beed Assembly Election

महत्त्वाच्या बातम्या

‘धर्माच्या नावाखाली तू…’; बिग बॉस संपलं तरीही मुनव्वर फारुकी होतोय ट्रोल

मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाबाबत रोहितची पत्नी पुन्हा बोलली, म्हणाली…

पाटलाच्या पोरानं दिल्लीच्या पैलवानाला केलं चितपट; जिंकला हिंदकेसरीचा किताब

यशस्वीचा यशस्वी प्रवास; मैदानावर राहून काढलेले दिवस, आता घेतलं ‘इतक्या’ कोटींचं घर

अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात?, मग ‘हे’ उपाय नक्की फॉलो करा