“अशोक सराफ म्हणजे मराठी मातीतला अस्सल हिरा”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maharashtra Bhushan Award | 57 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्कारासहीत सांस्कृतिक कार्य विभागाकडून कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलावंतांना देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचा वितरण सोहळा काल (22 फेब्रुवारी) मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. यावेळी मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना तर गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांकडून अशोक सराफ यांचा गौरव

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘अष्टपैलू’ हा शब्द खऱ्या अर्थनी ज्यांना लागू होतो ते नाव म्हणजे अशोक सराफ आहे. सलग 50 वर्ष असंख्य भूमिका करुनही अभिनयाची आणि नवं काही तरी करून दाखवण्याची त्यांची भूक अजूनही कायम आहे. अशोक सराफ हे वयाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना राज्य सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award ) त्यांना देण्यात येतोय, हा अवघ्या महाराष्ट्रासाठी केवळ अभिमानाचाच नाही तर अमृताहूनही गोड क्षण आहे.

गेल्या वर्षी ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले आणि ज्येष्ठ निरुपणकार तिर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्याची संधी मला मिळाली. यावर्षी अशोक सराफ यांचा आपण गौरव करत आहोत. त्यांनी त्यांच्या अभिनयाने मराठी रसिकांवर राज्य केले. प्रसिद्धीचे इतके वलय मिळूनही सराफ यांनी कधीही जमीनीशी नाते तोडले नाही.

मराठी रसिकांनीही त्यांच्या अभिनयावर भरभरून प्रेम केले. त्यांच्याप्रमाणेच सुरेश वाडकर यांनी अत्यंत कष्टपूर्व आपली सांगितीक कारकीर्द उभी केली. मराठी आणि हिंदीच नव्हे तर विविध भाषांतील त्यांची गाणी विशेष गाजली. सुरेशजींचा सुरेल आवाज आजही आपल्याला मंत्रमुग्ध करतो, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांचा गौरव केला.

मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा

यावेळी एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा देखील केली. मुंबईतल्या फिल्मसिटीत (Maharashtra Bhushan Award) शुटींगसाठी लागणाऱ्या सर्व अत्याधुनिक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच, मुंबई फिल्मसिटीबाहेर इतर जिल्ह्यात चित्रपटाची शुटींग करायची असेल तर ‘वन विंडो सिस्टीम’चा निर्णय सांस्कृतिक विभागाने घेतलाय.

या शुटींगसाठी कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. राज्यात 75 नवे नाट्यगृह उभारण्यासाठी 9 कोटी 33 लाखाचा निधी मंजूर केला असल्याचे देखील एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

News Title-  Eknath Shinde Appreciated Ashok Saraf In Maharashtra Bhushan Award Ceremony

महत्त्वाच्या बातम्या –

शेतकरी आंदोलन! जिममध्ये व्यायाम करताना DSP यांना हृदयविकाराचा झटका, जागीच मृत्यू

पत्नी दारू पिऊन धिंगाणा घालते, सतत पैसे मागते; पीडित पतीची पोलिसांत धाव

मृणाल ठाकूरला दिग्गदर्शकाने चित्रपट नाकारला; अभिनेत्रीनं सांगितलं धक्कादायक कारण

प्रतीक्षा संपली! IPL च्या 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर; लवकरच CSK vs RCB थरार

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन; 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास