शरद पवार गटाचं चिन्ह जाहीर, निवडणूक आयोग करणार लवकरच घोषणा

Sharad Pawar

Sharad Pawar Symbol | शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर पुतणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दावा केला. निवडणूक आयोगाने देखील पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार यांचं असल्याचा निर्णय दिला आहे. त्यानंतर शरद पवार यांनी अजित पवार आणि निवडणूक आयोगावर टीका केली आहे. निवडणूक आयोगाने आमच्यावर अन्याय केला असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत. यावर आता रोहित पवार (Sharad Pawar Symbol) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बारामतीच्या राजकारणामध्ये आता आणखी एका पवार कुटुंबातील युवकाची एंट्री झाली असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र योगेंद्र पवार यांची बारामतीच्या राजकारणामध्ये एंट्री होणार असल्याची चर्चा आहे. त्यांनी अनेक कार्यकर्त्यांची कार्यालयामध्ये जात भेट घेतली होती. पक्ष घेऊन गेल्याबाबत पवार कुटुंब अजित दादांवर नाराज आहेत, असं म्हटलं जात आहे. याचपार्श्वभूमीवर अजित दादा यांनी याआधी माझे कुटुंब माझ्याविरोधामध्ये प्रचार करतील असं वक्तव्य केलं आहे. त्यावर रोहित पवार (Sharad Pawar Symbol) यांनी नगरच्या सभेमध्ये अजित पवार यांच्यावर टीका केली.

काय म्हणाले रोहित पवार?

रोहित पवार (Sharad Pawar Symbol) यांनी नगरच्या सभेमध्ये अजित पवार यांच्यावर हल्ला केला आहे. अजित पवार यांनी येत्या निवडणुकीमध्ये आता माझेच कुटुंब माझ्याविरोधामध्ये प्रचार करतील असं अजितदादा बोलले होते. पवार कुटुंबाला अजित दादा भाजपसोबत गेलेलं पटलं नाही, असं रोहित पवार (Sharad Pawar Symbol) यांनी सांगितलं आहे. त्यांच्यावर अन्याय झाला असं आम्हाला कोणालाही वाटत नाही. पण त्यांनीच कुटुंबाला एकटं पाडलं आहे.

अजित दादांना शरद पवार यांनी मुलाप्रमाणे प्रेम केलं. जी मोठी संधी समोर आली ती कुटुंबातील इतर कोणालाही मिळाली नाही, तर ती दादांना मिळाली आहे. उलट अजित पवार यांनी कुटुंबाला एकटं पाडलं असल्याचं रोहित पवार म्हणाले आहेत.

“मशाल हातात घेत तुतारी वाजवा”

मशाल हे चिन्ह उद्धव ठाकरे यांना दिलं आहे. तसेच आता शरद पवार गटाला कोणतं चिन्ह दिलं जाणार याची प्रतिक्षा अनेकांना होती. मात्र आता यावर रोहित पवार यांनी स्पष्टोक्ती दिली आहे. रोहित पवार म्हणाले की नवीन नाव आणि चिन्ह मिळू नये असं अजित पवार गटाकडून प्रयत्न होते. मात्र निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाने चिन्ह देण्यासाठी सांगितले. म्हणून शरद पवार गटाचे चिन्ह हे तुतारी असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे.

Sharad Pawar faction of NCP gets 'man blowing turha' as party symbol - The Hindu

शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला वटवृक्ष हा पक्षचिन्हाचा प्रस्ताव मांडण्यात आला. तसेच वटवृक्ष, तुतारी आणि कपबशी या पक्षचिन्हामधून तुतारी पक्षचिन्ह देण्यात आल्याचं रोहित पवार म्हणाले आहेत. तसेच त्यांनी बारामती लोकसभा निवडणुकीवर देखील भाष्य केलं आहे. बारामतीमध्ये गाड्या फिरत आहेत, त्यावरून समजतंय की कुटुंबातील व्यक्ती विरोधक असणार आहे. सामान्य विरूद्ध शक्ती आणि अहंकार अशी लढाई असणार आहे. पण बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे खासदार असतील, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

News Title – Sharad pawar Symbol news update

महत्त्वाच्या बातम्या

पंकजा मुंडे ‘या’ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार?

भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन; वयाच्या 59 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

महिला आमदाराचा कार अपघातात मृत्यू; 33 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न मनोहर जोशींच्या रूपानं पूर्ण झालं – राज ठाकरे

शेतकरी आंदोलन! जिममध्ये व्यायाम करताना DSP यांना हृदयविकाराचा झटका, जागीच मृत्यू

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .