मोठी बातमी! मनोज जरांगेंना न्यायालयाचा मोठा झटका

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange Patil | मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी नव्याने आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. मात्र आंदोलन हिसंक होणार नाही? याची जबाबदारी ते घेणार का? राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही याची जबाबदारी घेणार का?, असे सवाल करत हायकोर्टाने जरांगे (Manoj Jarange Patil) यांना नोटीस बजावली आहे.

जरांगेंना न्यायालयाचा मोठा झटका

गुणरत्न सदावर्ते विरूद्ध मनोज जरांगे पाटील याचिका हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडली आहे. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी जरांगे यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दलही युक्तिवाद करण्यात आला.

मनोज जरांगे यांना भुमिका स्पष्ट करावी. मनोज जरांगे आणि मराठा आंदोलक समिती प्रस्तावित आंदोलन कसं करणार आहेत? आंदोलन हिसंक होणार नाही ? याची जबाबदारी ते घेणार का? राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही याची जबाबदारी घेणार का? या सर्व मुद्यांवर मनोज जरांगेंना 26 फेब्रुवारीपर्यंत भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश हायकोर्टाने दिले आहे.

मनोज जरांगे पुन्हा आंदोलन करणार

दरम्यान, गेल्या 12 दिवसांपासून मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू आहे. सरकार मागणी पूर्ण करत नसल्याचे जरंगे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार आहे. आता हे आंदोलन 24 फेब्रुवारीपासून म्हणजेच शनिवारपासून सुरू होणार आहे. आंदोलनादरम्यान रास्ता रोको, उपोषण होणार आहे. शुक्रवारपासून अनेक ठिकाणी रास्ता रोको सुरू झाला आहे. राज्य सरकार त्याला विरोध करत आहे.

जरंगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर 13 मार्च रोजी सुनावणी होणार होती. मात्र राज्य सरकारने अर्ज दाखल करून आज सुनावणी ठेवली.

आज झालेल्या सुनावणीत मनोज पाटील यांच्यावतीने अधिवक्ता विजय थोरात, याचिकाकर्त्याच्या वतीने अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांनी तर राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी युक्तिवाद केला.

महत्त्वाच्या बातम्या- 

दाऊद इब्राहिमच्या कुटुंबातील व्यक्तीवर गोळीबार, वाचा नेमकं काय घडलं?

‘आयुष्यात अंधार आलाय पण…’, घटस्फोटानंतर ईशा देओलची पोस्ट चर्चेत

“अशोक सराफ म्हणजे मराठी मातीतला अस्सल हिरा”

पाणी जपून वापरा! ‘या’ तारखेपासून पाणी कपात होणार

गुड न्यूज! सोने-चांदीचे भाव उतरले, जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर