रोहित पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप; म्हणाले..

Rohit Pawar | राष्ट्रवादी पक्षाचे शिवसेनेसारखेच दोन गट पडले आहेत. आता राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट असे दोन भाग पक्षाचे पडले आहेत. दोन्ही गटाकडून सतत काही न काही विषयांवरून एकमेकांवर निशाणा साधला जातो, आरोप केले जातात. अशातच आमदार रोहित पावर (Rohit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

बारामतीच्या राजकारणात दोन गट पडल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरूच आहेत. पवार कुटुंबातील आपापसातच बरीच वाद आता समोर येत आहेत. त्यातच अजित पवार यांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवार यांनी शरद पवारांबरोबर जाणार असल्याची घोषणा केल्याने अजित पवार कुटुंबात एकटे पडले असल्याची चर्चा होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवरच रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित पवारांची अजित पवारांवर टीका

मला माध्यमांकडूनच कळलं की, युगेंद्र बारामतीच्या ऑफिसला गेला होता. आजोबांना त्याने पाठिंबा दिला ही चांगली गोष्ट आहे. आपल्या वडिलधाऱ्यांबरोबर राहणं आपली जबाबदारी आहे. लहानपणापासूनच आपल्याला हे शिकवलं जातं. आपले वडील आणि आजोबांना वयस्कर झाल्यावर त्यांना बाहेर काढायचं हे आपल्या संस्कृतीत नाही. स्वतःचे हित जपण्यासाठी तुम्ही आपल्या काकांना, नेत्यांना सोडून जातायत ही आपली संस्कृती नाही, असे म्हणत अप्रत्यक्षपणे रोहित पवारांनी (Rohit Pawar) अजित पवार यांना टोला लगावला.

हसन मुश्रीफ यांनी अजित पवारांना कुटुंबात एकटं पाडलं जात असल्याचं वक्तव्य केलं होतं. यावर रोहित पवारांना सवाल करण्यात आला होता. याबाबत उत्तर देताना रोहित पवार म्हणाले की, “कुटुंब म्हणून अजित दादांना आम्ही खूप अगोदरपासून जाणतो. साहेबांनी (शरद पवार) अजित पवारांना मोठी ताकद दिली होती. अनेक मोठ-मोठी पदे अजित दादा (Ajit Pawar) यांना देण्यात आली. पण, प्रगती झाल्यानंतर साहेबांना सोडून जाणं, साहेबांनी बांधलेल्या घरातून साहेबांना बाहेर काढणं हा निर्णय त्यांनी घेतला तो कुटुंबाला आवडला नाही.”

“मला एकटे पाडण्याचा प्रयत्न..”

अजित दादांनी त्यांच्यासोबत जाण्याचा (भाजपा) निर्णय घेतल्याने कुटुंबाला ते पटलं नाही. जय आणि योगेंद्र पवार देखील बोलले की दादांना एकटं पाडलं नाही. मग आता दादा असं का म्हणत आहेत की त्यांना एकटं पाडलं?, असा प्रतिसवाल करत रोहित पवार यांनी अजित पवारांवर टीका केली.

“बारामतीमध्ये मी आणि माझा परिवार सोडला तर सर्व जण माझ्या विरोधात प्रचार करतील. मला एकटे पाडण्याचा प्रयत्न काही जण करतील. घरातील सर्व माझ्या विरोधात गेले. तरी तुम्ही सर्व माझ्याबरोबर आहात. तुमची साथ आहे, तुमचा पाठिंबा आहे. तुमची एकजूट आहे. तोपर्यंत माझे काम असेच चालत राहणार आहे.”, असे अजित पवार बूथ कमिटी मेळाव्यात बोलत होते. यानंतर रोहित पवार (Rohit Pawar) यांनी त्यावर प्रत्युत्तर दिलं आहे.

News Title-  Rohit Pawar accusation against Ajit Pawar

महत्त्वाच्या बातम्या –

पंकजा मुंडे ‘या’ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार?

भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन; वयाच्या 59 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

महिला आमदाराचा कार अपघातात मृत्यू; 33 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न मनोहर जोशींच्या रूपानं पूर्ण झालं – राज ठाकरे

शेतकरी आंदोलन! जिममध्ये व्यायाम करताना DSP यांना हृदयविकाराचा झटका, जागीच मृत्यू