उद्धव ठाकरेंना धक्का?; ईडीच्या कचाट्यात सापडलेला नेता शिंदे गटाच्या वाटेवर?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ravindra Waikar | गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे अनेक नेते शिंदे गटामध्ये प्रवेश करत असल्याचं दिसत आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून जसजशी लोकसभा निवडणूक जवळ येत आहे तशी शिंदे गटामध्ये इनकमिंग होताना दिसत आहे. काही दिवसांआधी शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी रवींद्र वायकर (Ravindra Waikar) हे शिंदे गटामध्ये जाणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. आताही तशाच काहीशा चर्चा आहेत.

जोगेश्वरी भूखंडप्रकरणात रवींद्र वायकर अडचणीत

जोगेश्वरी पूर्व मतदारसंघाचे आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) आहेत. वायकर यांच्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. वायकर (Ravindra Waikar) यांच्यावर जमीन घोटाळाप्रकरणी वाद असल्याचं बोललं जात आहे. सप्टेंबर 2023 महिन्यामध्ये रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्यावर ईडी चौकशी सुरू होती. यावेळी वायकर यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर वायकर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घतली असून पक्ष तुमच्या पाठिशी असल्याचं ते बोलले.

रवींद्र वायकर यांच्याकडून पुनर्विचाराचा प्रस्ताव आला. त्या प्रस्तावावर विचार करण्याची तयारी  मुंबई मनपाने दाखवली होती. जोगेश्वरी सुप्रीमो क्लब प्रकरणात परवानगी देताना जमीन घोटाळा झाल्याचा आरोप झाला. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. आता न्यायालयात रवींद्र वायकर यांच्या प्रस्तावावर पुनर्विचार करण्याची तयारी मनपाने दाखवली आहे. याचप्रकरणी शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी रवींद्र वायकर हे शिंदे गटामध्ये जाण्याबाबत वक्तव्य केलं होतं.

काय म्हणाले संजय शिरसाट?

गेल्या काही दिवसांआधी संजय शिरसाट यांनी अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले आहेत. संजय शिरसाट म्हणाले की मी अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यावेळी अशोक चव्हाण म्हणाले की संजय शिरसाट काय ज्योतिष आहेत का? पण अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले. आता रवींद्र वायकर देखील शिंदे गटाच्या वाटेवर आहेत, असं संजय शिरसाट म्हणाले.

संजय राऊतांकडून हल्ला

संजय राऊत यांनी रवींद्र वायकर यांच्यामागे ईडी चौकशी केली जात असून दबावतंत्राचा वापर केला जात असल्याचं बोललं गेलं आहे. येत्या काळामध्ये शिवसेना सोडा आणि पक्षांतर करा, नाहीतर तुरुंगात जा असे त्यांना धमकावले जात आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. मात्र यावर रवींद्र वायकर यांनी दबावतंत्राला भीक घालणार नसल्याचं म्हटलं होतं.

जोगेश्वरी भूखंडप्रकरणावरून सध्या रवींद्र वायकर यांच्यावर ईडीची टांगती तलवार असल्याचं बोललं जात आहे. याआधी वायकर यांच्यावर अनेकदा ईडीची तपासणी झाली असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान संजय शिरसाट यांनी अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा केला होता. आता तो दावा खरा ठरला आहे. आता पुन्हा एकदा शिरसाट यांनी वायकर यांच्याबाबत शिंदे गटात जाणार असल्याचा दावा केला आहे.

News Title – Ravindra Waikar Will enter At Shinde group

महत्त्वाच्या बातम्या