शर्मिला ठाकरे अन् अमित ठाकरे उतरले पुण्याच्या रस्त्यावर, केली मोठी मागणी

Amit Thackeray | गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबतच पत्नी शर्मिला ठाकरे या अॅक्टिव मोडवर पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला लेक अमित ठाकरे (Amit Thackeray) देखील राज ठाकरे यांच्यासोबत दिसत आहेत. अशातच आता अमित ठाकरे (Amit Thackeray) अन् शर्मिला ठाकरे हे मनसेच्या पुण्यातील मोर्चामध्ये सामिल झाले आहेत.

शर्मिला ठाकरे अन् अमित ठाकरे मोर्चामध्ये

मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला आहे. आई अन् मुलगा अर्थातच शर्मिला ठाकरे आणि अमित ठाकरे (Amit Thackeray) या मोर्चामध्ये दिसत आहेत. याआधी मनसेनं पुणे शहरामध्ये जात चांगला जम बसवण्याचं काम केलं आहे. पुणे शहरामध्ये मनसेकडून हा मोर्चा आता पुणे विद्यापीठ येथे नेण्यात आला आहे.

आई आणि मुलगा मोर्च्यात आल्यामुळे तो कुतूहल आणि चर्चेचा विषय ठरला होता. चतुर्श्रुंगी मंदिरापासून ते पुणे विद्यापीठापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात मोठ्या संख्येने मनसे विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

चतुश्रूंगी ते पुणे विद्यापीठापर्यंत हा मोर्चा नेण्यात आला आहे. या मोर्चाचे नेतृत्व अमित ठाकरे (Amit Thackeray) करताना दिसत आहे. या मोर्चामध्ये मनसे विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते या मोर्चामध्ये सामिल झाले आहेत.

विद्यार्थ्यांच्या मागण्या 

विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा विद्यापीठावर धडकला तेव्हा त्यांना अडवण्यात आलं. तसेच वसतीगृहांचा दर्जा सुधारणे, तसेच मराठी भाषा भवन बांधकाम करावं, अशी मागणी विद्यार्थ्यांची आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांचा पुणे दौरा सुरू आहे. पुण्यामध्ये पक्ष बांधणीकडे त्याचं विशेष लक्ष असल्याचं पाहायला मिळतंय. यामुळे अमित ठाकरे यांनी शर्मिला ठाकरे यांनी पुण्यातील विद्यार्थ्यांच्या समस्येवर लक्ष केंद्रीत केलं आहे.

बाळा नांदगावकर उपस्थित 

यामोर्चामध्ये शर्मिला ठाकरेसोबतच बाळा नांदगावकर देखील उपस्थित होते. अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा असून पुणे विद्यापीठांच्या कुलगुरूंना अमित ठाकरे यांच्या शिष्ठमंडळाखाली निवेदन देण्यात आलं आहे.

News Title – Amit Thackeray And Sharmila Thackeray at pune morcha

महत्त्वाच्या बातम्या

दाऊद इब्राहिमच्या कुटुंबातील व्यक्तीवर गोळीबार, वाचा नेमकं काय घडलं?

‘आयुष्यात अंधार आलाय पण…’, घटस्फोटानंतर ईशा देओलची पोस्ट चर्चेत

“अशोक सराफ म्हणजे मराठी मातीतला अस्सल हिरा”

पाणी जपून वापरा! ‘या’ तारखेपासून पाणी कपात होणार

गुड न्यूज! सोने-चांदीचे भाव उतरले, जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर