Eknath Khadase Vs Raksha Khadase | आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक असे मतदारसंघ आहेत जिथं नात्यांमध्ये राजकीय लढाई पाहायला मिळते. बारामती मतदारसंघामध्ये काका पुतणे, नणंद भाऊजय, दादा ताई, अशी लढत बारामती मतदारसंघामध्ये पाहायला मिळते. तर आतापर्यंत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बहिण भावामध्ये अनेक राजकीय मतभेद होते. मात्र अजित पवार गटामध्ये धनंजय मुंडे यांनी प्रवेश केला अन् पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील वाद मिटलेला पाहायला मिळाला आहे. (Eknath Khadase Vs Raksha Khadase)
बारामती, बीड मतदारसंघाप्रमाणे आता रावेर मतदारसंघाची सर्वत्र चर्चा आहे. कारण या मतदारसंघामध्ये एकनाथ खडसे आणि त्यांची सून रक्षा खडसे सून आणि सासऱ्यामध्ये (Eknath Khadase Vs Raksha Khadase) आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये लढत होणार का?, असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे.
कारण याआधी लोकसभा निवडणुकीचे गणित हे फार वेगळं होतं मात्र सध्याचं देशातील राजकारण पाहता यंदा अनेक मतदारसंघामध्ये उमेदवार कोण असेल यावरून काहीच भाष्य करत येत नाही. रावेरमध्ये एकनाथ खडसे हे ऱाष्ट्रवादीमध्ये आहेत. तर त्यांच्या सूनबाई म्हणजेच रक्षा खडसे या भाजपमध्ये आहेत. यामुळे सासरा विरूद्ध सूनबाई (Eknath Khadase Vs Raksha Khadase) अशी लोकसभा निवडणुकीमध्ये खडाजंगी पाहायला मिळणार का? यावर अजून रक्षा खडसेंनी उत्तर दिलं आहे.
काय म्हणाल्या रक्षा खडसे?
टीव्ही 9 मराठी माध्यमाशी बोलत असताना रक्षा खडसे यांनी रावेर मतदारसंघासाठी दावा केला आहे. “माझा रावेर मतदारसंघामध्ये दावा असणार आहे. कारण मला दोनदा पक्षाने संधी दिली आहे. रावेरमधील मतदारांनी मताधिक्याने विजयी केलं आहे. पण शेवटी पक्षातील वरिष्ठांचा निर्णय असतो”, अस त्या म्हणाल्या आहेत. (Eknath Khadase Vs Raksha Khadase)
यावेळी रक्षा खडसे यांना आपल्याला लोकसभा निवडणुकीचं तिकिट देण्याबाबत काही चर्चा आहे का? असं विचारलं असता त्या म्हणाले की, पक्षामध्ये तशी काहीही लॉबिंग नाही. जो काम करेल पक्ष त्याला संधी देईल, असं म्हणत नाथाभाऊंनी भाजपमध्ये यावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
सासरे विरूद्ध सून लढणार?
माध्यमांनी सून विरूद्ध सासू अशी राजकीय लढत होईल का? प्रश्न केला असता त्यावर त्या म्हणाल्या की “अजून दोन्ही पक्षाकडून तसे काहीही आदेश नाहीत. याबाबत अद्यापही कोणतीही चर्चा नाही”, असं रक्षा खडसे म्हणाल्या आहेत.
News Title – Eknath Khadase Vs Raksha Khadase News update
महत्त्वाच्या बातम्या
रोहित पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप; म्हणाले..
पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!
शरद पवार गटाचं चिन्ह जाहीर, निवडणूक आयोग करणार लवकरच घोषणा
मोठी बातमी! मनोज जरांगेंना न्यायालयाचा मोठा झटका
दाऊद इब्राहिमच्या कुटुंबातील व्यक्तीवर गोळीबार, वाचा नेमकं काय घडलं?