“छत्रपतींचं नाव घेतल्यामुळे मुस्लिमांची..”, राज ठाकरेंचं शरद पवारांबद्दल खळबळजनक वक्तव्य

Raj Thackeray statement about Sharad Pawar

Raj Thackeray | ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्रजी पवार’ गटाने आज (24 फेब्रुवारी) रायगड किल्ल्यावर मोठं शक्तीप्रदर्शन तुतारी फुंकणाऱ्या व्यक्तीच्या चिन्हाचं अनावरण केलं. या संदर्भात मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना आज प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी शरद पवारांबद्दल खळबळजनक वक्तव्य केलं.

“शरद पवार यांना तुतारी चिन्ह मिळाले मग काय करायचे?, तुतारी फुंका आता. छत्रपतींचं कधीही नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला.”, असा टोला राज ठाकरे यांनी शरद पवार यांना लगावला आहे.

पुढे टे म्हणाले की, मी मागेही यावर बोललो आहे. फुले-शाहू-आंबेडकर नाव घेत असताना शरद पवार छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव का घेत नाहीत? असा प्रश्न मी त्यांना मागेही विचारला आहे.छत्रपतींचं नाव घेतल्यावर मुस्लिमांची मते जातात, अशा संभ्रमावस्थेत त्यांनी इतकी वर्ष काढली आणि आता त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाली. अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे.

“..तर महाराष्ट्राचा चिखल होईल”

यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एक आठवण सांगत महाराष्ट्रातील आताच्या राजकारणावर देखील भाष्य केलं. “मागे मला एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नगरसेवक भेटले. तेव्हा त्यातील काही जण म्हणाले आम्ही शरद पवार गटाचे तर बाकीचे काही जण म्हणाले अजित पवार गटातून आहोत. असं विचित्र वातावरण महाराष्ट्राने कधीही पाहिले नव्हतं. यांना आता नगरकांनीच ठिकाण्यावर आणलं पाहिजे. नाहीतर, राज्याचा चिखल होईल.”

रायगडावर शरद पवार गटाच्या चिन्हाचं अनावरण

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमित जाऊन ऐतिहासिक अशा किल्ले रायगडावर आज शरद पवार गटाच्या चिन्हाचं अनावरण करण्यात आलं. यावेळी शरद पवार यांनी मोठं आवाहन केलं. “निवडणूक आयोगाने रणशिंग फुंकायला तुतारी दिली आहे. संघर्षातून प्रेरणा देणारी ही तुतारी असून तुमच्या संघर्षातून, त्यागातून यश मिळणार याची मला खात्री आहे. या ऐतिसाहिक भूमीत आपण आलोय. या ठिकाणाहून प्रेरणा घेऊन जनतेची सेवा करुया”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

शरद पवार यांना रायगडावर बघून राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्यांच्यावर टीका केली. तसंच भाजपाकडूनही यावर टीका करण्यात आली. तुम्ही तुताऱ्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा. पण आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आम्ही 45 पेक्षा जास्त जागा निवडणूक आणू,असा इशाराच महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

News Title – Raj Thackeray statement about Sharad Pawar

महत्त्वाच्या बातम्या-

सासऱ्यांविरोधात लढणार का?; रक्षा खडसेंनी स्पष्टच सांगितलं

शर्मिला ठाकरे अन् अमित ठाकरे उतरले पुण्याच्या रस्त्यावर, केली मोठी मागणी

उद्धव ठाकरेंना धक्का?; ईडीच्या कचाट्यात सापडलेला नेता शिंदे गटाच्या वाटेवर?

रोहित पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप; म्हणाले..

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .