Investment | प्रत्येकाला आपल्या भविष्याची चिंता लागलेली असते.त्यातच कधी कोणती अडचण समोर येईल सांगता येत नाही.त्यामुळे आपल्याकडे मोठी आर्थिक गुंतवणूक (Investment) असणे अत्यंत गरजेचे बनले आहे. मुलांचे शिक्षण असो की आरोग्याच्या समस्या असोत, पैशांची गरज कधीही भासू शकते.
त्यामुळे आपल्याकडे अगोदरच आर्थिक गुंतवणूक असायला हवी. यासाठी पैसे नेमके कुठे गुंतवले की फायदा होईल, याची निवड करणेही कठीण जाते. आता तुम्हाला काही अशा स्किम सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला अधिक नफा मिळू शकतो. काही वर्षांमध्ये तुम्ही मुलांसाठी जमा केलेल्या गुंतवणुकीत उत्तम परतावा (रिटर्न) मिळवाल.
आता या स्कीम नेमक्या कोणत्या आणि यामध्ये किती पैसे गुंतवावे लागतील, याची चिंता विसरून जा. कारण, ही बातमी तुमच्यासाठीच आहे.तुम्हाला इथे गुंतवणुकीपासून परतावा किती मिळणार, याची सविस्तर माहिती दिली आहे.
‘या’ 3 स्कीममुळे व्हाल लखपती
PPF : अर्थातच पब्लिक प्रोविडेंट फंड ही एक सरकारी स्किम (Investment ) असून यामध्ये प्रत्येक वर्षी 500 रुपये डिपॉजिट गरजेचं असतं. पण, तुम्ही जर भविष्यासाठी दर महिन्याला 500 रुपये जमा करत असाल. तर चांगली रक्कम तयार होते. या योजनेत तुम्हाला 7.1% चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो. ही स्किम 15 वर्षांत मॅच्योर होते.
म्हणजेच 15 वर्षांमध्ये तुमच्याकडे 90 हजार रुपये जमा होतील. यासोबतच 15 वर्षांत तुम्हाला 72,728 रुपये व्याज आणि मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण 1,62,728 रुपये मिळतील. ही स्कीम तुम्हाला फायदाच फायदा मिळवून देऊ शकते.
SSY : म्हणजेच सुकन्या समृद्धी योजना ही देखील सरकारची योजना आहे. तुम्ही यात वार्षिक किमान 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये गुंतवू शकता. यावर तुम्हाला 8.20% व्याजदर मिळेल. मात्र, ही स्कीम 21 वर्षांनंतर मॅच्योर होते. 21 वर्षांत तुम्हाला या स्कीममुळे व्याज म्हणून 1,87,103 रुपये तर मॅच्युरिटीवर 2,77,103 रुपये मिळतील.
SIP : तुम्ही जर दीर्घकाळासाठी SIP मध्ये पैसे गुंतवत (Investment ) असाल तर, तुम्हाला मोठा फायदा होईल. तुम्ही दर महिन्याला जर 500 रुपये गुंतवले तर,15 वर्षांनी 12 टक्के व्याजदराने तुम्हाला 2,52,288 रुपये मॅच्युरिटी रक्कम म्हणून मिळतील. हीच गुंतवणूक तुम्ही 20 वर्षांपर्यंत केली तर, 12 टक्क्यांनुसार तुम्ही 4,99,574 रुपये, म्हणजे सुमारे 5 लाख रुपयांचं रिटर्न तुम्हाला मिळू शकते.
News Title – Investment Scheme
महत्त्वाच्या बातम्या-
सासऱ्यांविरोधात लढणार का?; रक्षा खडसेंनी स्पष्टच सांगितलं
शर्मिला ठाकरे अन् अमित ठाकरे उतरले पुण्याच्या रस्त्यावर, केली मोठी मागणी
उद्धव ठाकरेंना धक्का?; ईडीच्या कचाट्यात सापडलेला नेता शिंदे गटाच्या वाटेवर?