मोहम्मद शमीला खास पुरस्कार; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते सन्मान

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mohammed Shami | मागील वर्षी भारतात पार पडलेल्या वन डे विश्वचकात मोहम्मद शमीने ऐतिहासिक कामगिरी केली. मोहम्मद शमीने उत्कृष्ट गोलंदाजी करून सर्वाधिक बळी घेण्याचा मान पटकावला. 2023 मध्ये मोहम्मद शमीच्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. मात्र, आता मोहम्मद शमीला विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. खरं तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोहम्मद शमीला हा पुरस्कार दिला आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने मोहम्मद शमीची त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी TOISA पुरस्कारासाठी निवड केली.

यानंतर मोहम्मद शमीने सोशल मीडियावर पोस्ट करत पुरस्काराबाबत माहिती दिली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोहम्मद शमीचा TOISA पुरस्कार देऊन गौरव केला. यानंतर या वेगवान गोलंदाजाने सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते पुरस्कार

मोहम्मद शमीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये मोहम्मद शमीने लिहिले की, हे सांगताना खूप आनंद होत आहे की मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सर यांनी मला प्रतिष्ठित टाइम्स ऑफ इंडिया TOISA पुरस्कार (क्रिकेटर ऑफ द इयर) देऊन सन्मानित केले आहे. हा पुरस्कार उत्तर प्रदेश सरकारने प्रदान केला आहे.

खरं तर मोहम्मद शमी आयपीएल 2024 च्या हंगामामध्ये खेळू शकणार नाही. मोहम्मद शमी न खेळणे हा गुजरात टायटन्ससाठी मोठा धक्का मानला जात आहे. मोहम्मद शमी त्याच्या शस्त्रक्रियेसाठी इंग्लंडला जाणार आहे. मोहम्मद शमीच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकली तर या खेळाडूने आतापर्यंत 110 आयपीएल सामन्यांमध्ये 127 बळी घेतले आहेत.

 

Mohammed Shami चा खास सन्मान

शमीची अनुपस्थिती हा गुजरात टायटन्ससाठी मोठा धक्का मानला जात आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वात प्रथमच गुजरातचा संघ आयपीएलच्या यंदाच्या हंगामात दिसणार आहे. हार्दिक पांड्याची मुंबई इंडियन्सच्या संघात घरवापसी झाल्यानंतर शुभमनकडे गुजरातच्या संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले.

वन डे विश्वचषक 2023 मोहम्मद शमीने गाजवला असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. त्याने सर्वाधिक बळी घेऊन मिळालेल्या संधीचे सोने केले. सुरूवातीच्या सामन्यांमध्ये संधीच्या शोधात असलेल्या शमीला संधी मिळताच त्याने पहिल्याच सामन्यात 5 बळी घेऊन पंजा मारला.

News Title- Team India player Mohammad Shami was felicitated by Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath with TOISA award
महत्त्वाच्या बातम्या –

अम्पायरला शिवी देणं खेळाडूला भोवलं; ICC ने सुनावली मोठी शिक्षा

बाबर आझमसमोर आक्षेर्पाह नारेबाजी; पाकिस्तानचा माजी कर्णधार भडकला, Video Viral

हॉटनेसचा तडका अन् मनोरंजन! करीना, तब्बू आणि क्रितीचा ‘क्रू’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

रणजी ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान दुर्दैवी घटना; युवा खेळाडूच्या मृत्यूमुळे खळबळ

आमिर खानला ‘त्या’ गोष्टीचा अजूनही होतोय पश्चाताप; मोठा खुलासा करत म्हणाला…