आमिर खानला ‘त्या’ गोष्टीचा अजूनही होतोय पश्चाताप; मोठा खुलासा करत म्हणाला…

The Great Indian Kapil Sharma Show

Aamir Khan | बॉलिवूड अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाच्या अपयशानंतर त्याने कामातून ब्रेक जाहीर केला होता. दरम्यान, आमिर (Aamir Khan ) आता पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे. एका मुलाखतीमध्ये त्याने या चित्रपटाच्या अपयशातून खूप काही शिकल्याचे सांगितले.

आमिर खानचा मोठा खुलासा-

‘लाल सिंह चड्ढा’बद्दल बोलताना आमिर खान म्हणाला, “हा माझा ड्रीम प्रोजेक्ट होता. करीना आणि माझ्या संपूर्ण टीमने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली, पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल दाखवू शकला नाही. या गोष्टीचा मला बराच त्रास झाला.”

पुढे बोलताना तो म्हणाला की, बऱ्याच काळानंतर माझा हा चित्रपट अपयशी ठरला. त्यावेळी माझे कुटुंबीय आणि मित्र मी ठीक आहे का, हे विचारण्यासाठी मला घरी येऊन भेटत होते. मला त्यावेळी ही जाणीव झाली की, चित्रपट आपटल्यानंतर मला जास्त प्रेम मिळालं. माझी जास्त काळजी घेण्यात आली.

“मी किरणला म्हणालो होतो की,..”-

अपयश तुम्हाला शिकवते की तुम्ही खरोखर काय चूक केली. हेच अपयश तुम्हाला चुका सुधारण्याची संधी देत असते. या चित्रपटाचे अपयश माझ्यासाठी खूप मोठी शिकवण होती.मी याबाबत एकदा किरणला म्हणालो होतो, या चित्रपटात माझ्याकडून अनेक चुका झाल्या आहेत. सुदैवाने, मी फक्त एका चित्रपटात या चुका केल्या. ‘लाल सिंह चड्ढा’ चालला नाही याचं मला अजूनही दुःख होतं. असे आमिर खान (Aamir Khan ) याने म्हटलं.

2022 मध्ये रिलीज झालेल्या ‘लाल सिंग चड्ढा’ बद्दल बोलायचं झालं तर हा चित्रपट टॉम हँक्सच्या 1994 मध्ये आलेल्या फॉरेस्ट गंपचा रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले होते. या चित्रपटात आमिर खानसोबत अभिनेत्री करीना कपूर आणि नागा चैतन्य मुख्य भूमिकेत दिसले होते.

आमिर खान करणार कमबॅक-

2022 मध्ये ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर आमिर खानने (Aamir Khan ) अभिनयातून ब्रेक घेतला होता. आता तो निर्माता म्हणून बॉलीवुडमध्ये सक्रिय आहे. सध्या तो राजकुमार संतोषी आणि सनी देओलसोबत ‘लाहोर 1947’ या चित्रपटासाठी काम करत आहे.

News Title – Aamir Khan big revelation

महत्त्वाच्या बातम्या-

सासऱ्यांविरोधात लढणार का?; रक्षा खडसेंनी स्पष्टच सांगितलं

शर्मिला ठाकरे अन् अमित ठाकरे उतरले पुण्याच्या रस्त्यावर, केली मोठी मागणी

उद्धव ठाकरेंना धक्का?; ईडीच्या कचाट्यात सापडलेला नेता शिंदे गटाच्या वाटेवर?

रोहित पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप; म्हणाले..

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .